Salman Khan Not Hosting Bigg Boss OTT 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 Release Date : 'बिग बॉस १८'ची तारीख ठरली, पुढच्या सीझनमधील पहिला स्पर्धकही ठरला

Chetan Bodke

'बिग बॉस ओटीटी ३'च्या ग्रँड फिनालेला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. लवकरच प्रेक्षकांना 'बिग बॉस ओटीटी ३'चा फायनलिस्ट मिळणार असून गेल्या अनेक दिवसांपासून या शोची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू आहे, 'बिग बॉस १८'ची. 'बिग बॉस ओटीटी ३'नंतर लवकरच आता 'बिग बॉस १८' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक आता 'बिग बॉस १८' साठी खूपच उत्सुक असून प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'बिग बॉस १८'ची जोरदार चर्चा सुरू आहे. पण या चर्चांदरम्यानच आता 'बिग बॉस १८'च्या प्रदर्शनाच्या तारखेची अपडेट समोर आली असून पहिल्या स्पर्धकाचंही नाव आता समोर आलं आहे. येत्या ५ ऑक्टोबर २०२४ पासून 'बिग बॉस १८' सुरू होण्याची शक्यता आहे. द खबरीच्या रिपोर्टनुसार, शोमध्ये येणार्‍या पहिल्या स्पर्धकाचं नाव शोएब इब्राहिम आहे.

'बिग बॉस'च्या टीमकडून त्याला संपर्क करण्यात आला असून तो शोमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. अनिल कपूरच्या 'बिग बॉस ओटीटी ३' नंतर 'बिग बॉस मराठी ५' ही सुरू होणार आहे. या शोचं होस्टिंग महेश मांजरेकर करणार नसून रितेश देशमुख करणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस मराठी ५' मध्ये रितेश देशमुख सलमान खानच्या 'बिग बॉस १८'चं प्रमोशन करणार आहे. या दोन्ही शोचे सेट मुंबईतील फिल्मसिटीमध्येच आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT