Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Bigg Boss 18'मध्ये डबल धमाका, मुस्काननंतर नायराचीही घरातून एक्झिट

Nyra Banerjee: 'बिग बॉस 18'मध्ये गेल्या आठवड्यात डबल एलिमिनेशन पार पडले आहे. मुस्कानसोबतच नायरालाही घरातून बाहेर जावे लागले आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 18'चा (Bigg Boss 18) खेळ दिवसेंदिवस रंगत जात आहे. बिग बॉसच्या घरातून गेल्या आठवड्यात मुस्कान बामने बाहेर गेली. सर्व सदस्यांनी मिळून मुस्कानला एलिमिनेट केलं होतं. आता रविवारी झालेल्या 'वीकेंड का वार' मध्ये (Weekend Ka Vaar) नायरा बॅनर्जीची (Nyra Banerjee) देखील बिग बॉसच्या घरातून एक्झीट झाली आहे.

'वीकेंड का वार' हा ट्विस्टने भरलेला होता. बिग बॉसच्या तिसऱ्या आठवड्यात घरातील दोन सदस्य बाहेर गेले. यात मुस्कानसोबत नायरा बॅनर्जी देखील घरातून बाहेर पडली. या 'वीकेंड का वार' ला बिग बॉसच्या घरात रोहित शेट्टी आणि अजय देवगण आले होते. यांनी सदस्यांसोबत खूप धमाल केली आहे. रोहित शेट्टी आणि अजय देवगण 'सिंघम अगेन' या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या मंचावर आले होते. भाईजान म्हणजे सलमान खानची देखील 'सिंघम अगेन' एक झलक पाहायला मिळणार आहे. 'सिंघम अगेन' हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात पाच जण नॉमिनेट झाले होते. यात विवियन डीसेना , अविनाश मिश्रा, मुस्कान बामने, रजत दलाल आणि नायरा बॅनर्जी यांचा समावेश होता. यातील विवियन डीसेना , अविनाश मिश्रा आणि रजत दलाल सुरक्षित झाले असून नायरा बॅनर्जी आणि मुस्कान बामने घराचा निरोप घ्यावा लागला. नायरा बॅनर्जी घरातून बाहेर गेल्यामुळे घरातील सदस्य खूप दुःखी दिसत आहेत. नायरा घराबाहेर गेल्यामुळे श्रुतिका खूप भावुक होते. आता बिग बॉसच्या नवीन आठवड्यात कोण नॉमिनेट होणार, कसा रंगणार नॉमिनेशन टास्क याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer Koliwada Recipe : रोजच्या वरण भाताला कंटाळलात? मस्त चटपटीत पनीर कोळीवाडा रेसिपी बनवा फक्त १५ मिनिटांत

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवड शहरात आजपासून पाणी पुरवठ्यात 15 टक्के पाणी कपात

Cornflakes Chivda: शाळेत सुका खाऊ देण्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत स्वादिष्ट मक्याचा चिवडा, वाचा रेसिपी

रक्तातील साखर वाढणार नाही! फक्त या 3 भाज्या खा

पगडीने तोंड दाबलं, हाताची नस कापली, गळा दाबून 7 वर्षांच्या निरागस मुलाची हत्या, भद्रकालीच्या जंगलात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT