Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Bigg Boss 18'च्या चौथ्या आठवड्यात सात सदस्य नॉमिनेट, कोण होणार घराबाहेर?

Bigg Boss 18 Latest Update : 'बिग बॉस 18'चा चौथा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात घरातून कोण नॉमिनेट झाले जाणून घ्या.

Shreya Maskar

'बिग बॉस 18' चा (Bigg Boss 18) आता चौथा आठवडा सुरू आहे. चार आठवडे घरातील सदस्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. बिग बॉस सुरू झाल्यापासून रोज घरात एक नवीन राडा पाहायला मिळत आहे. नुकतीच घरात चौथा आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आहे. या आठवड्यात प्रत्येक सदस्याला घरातील इतर दोन सदस्यांना नॉमिनेट करायचं होतं.

'बिग बॉस 18' मध्ये कोणताही गेम ट्विस्ट शिवाय अशक्य आहे. त्यामुळे यामध्येही मोठा ट्विस्ट बिग बॉसने आणला आहे. ज्या सदस्याला नॉमिनेट केले जात होते. त्या सदस्याला करंटचा झटका दिला गेला. नॉमिनेशन प्रक्रियेत चूक केल्यामुळे चुम दरांगने चूक केल्यामुळे तिची इतर सदस्यांना नॉमिनेट करण्याची संधी गेली. प्रत्येकजण कन्सेशन रूममध्ये जाऊन घरातील दोन सदस्यांना नॉमिनेट करतो. मात्र चुम दरांगने घरातील सदस्याला नॉमिनेट करण्याअगोदर त्याची माफी मागितली. मात्र हेच बिग बॉसला पटले नाही आणि त्यांनी चुम दरांगाकडून नॉमिनेशनचा अधिकार काढून घेतला. त्यावर चुम दरांगने बिग बॉसची माफी देखील मागितली नाही.

बिग बॉसच्या चौथ्या आठवड्यात ईशा सिंह, श्रुतिका अर्जुन, शिल्पा शिरोडकर, ॲलिस कौशिक, अरफीन खान, शहजादा आणि अविनाश मिश्रा या सात सदस्य नॉमिनेट करण्यात आले आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. या 'वीकेंड का वार' ला सलमान खान कोणाची शाळा घेणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

SCROLL FOR NEXT