Amitabh Bachchan : रतन टाटांनी का मागितले बिग बींकडून पैसे? KBCच्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा

Amitabh Bachchan Remembers Ratan Tata on KBC 16 : 'कौन बनेगा करोडपती' च्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी रतन टाटा यांच्या आठवणींना उजाळा दिला. भावुक होऊन त्यांनी आपल्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला आहे.
Amitabh Bachchan Remembers Ratan Tata on KBC 16
Amitabh BachchanSAAM TV
Published On

बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या 'कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) सीझन 16' होस्ट करताना पाहायला मिळत आहेत. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी दिवंगत रतन टाटा यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. रतन टाटा हे भारतातील दिग्गज उद्योगपती होते. नुकतेच 9 ऑक्टोबरला त्यांचे निधन झालं. वयाच्या 86 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनने देशभरात शोककळा पसरली.

'कौन बनेगा करोडपती' च्या सेटवर दिवंगत रतन टाटा यांच्या आठवणींना उजाळा देत अमिताभ बच्चन यांनी एक किस्सा सांगितला. अमिताभ बच्चन म्हणाले की, "रतन टाटा हे सर्वात साधे माणूस होते. एकदा आम्ही दोघांनी एकाच फ्लाईटमधून लंडनला प्रवास केला होता. तेव्हा त्यांना जे लोक घ्यायला येणार होते ते आले नव्हते. त्यामुळे ते फोन बूथमध्ये गेले आणि थोड्या वेळाने बाहेर आले. यावेळी त्यांनी माझी मदत मागितली. ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले की, अमिताभ तुम्ही मला काही उधार पैसे देऊ शकता का? माझ्याकडे फोन करण्यासाठी पैसे नाही आहेत. ते असे बोलतील याचा मी कधी विचारही केला नव्हता. "

'कौन बनेगा करोडपती 16' मध्ये अभिनेता बोमन ईराणी आणि दिग्दर्शक फराह खान पाहुणे म्हणून आले आहेत. तेव्हा बोमन ईराणी आणि फराह खानसोबत संवाद साधताना ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी दिवंगत रतन टाटा यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Amitabh Bachchan Remembers Ratan Tata on KBC 16
Suraj Chavan : गुलिगत सूरजच्या नव्या घराच्या गृहप्रवेशाचा मुहूर्त ठरला, अजित पवारांनी भरसभेत सांगितली तारीख

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com