सध्या सर्वत्र सूरज चव्हाणची (Suraj Chavan) हवा पाहायला मिळत आहे. सूरजने 'बिग बॉस मराठी 5' जिंकून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. 28 ऑक्टोबरला निघालेल्या बारामती विधानसभा मतदार संघाच्या रॅलीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाषण केले. यावेळी सूरज चव्हाण उपस्थित होता. तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाणच्या घरासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.
अजित पवार सूरज विषयी बोलताना म्हणाले की, "सूरजच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र गेले, त्यामुळे पाच बहिणींनी त्याचा सांभाळ केला आहे. त्याने मोढवेसारख्या गावात राहून शिकायला हवे होते, पण दुर्दैवाने तो शाळेत जाऊ शकला नाही. पण बिग बॉसमध्ये गेला. सगळ्यांवर बॉसगिरी दाखवली आणि अखेर बिग बॉसचा विजेता झाला. सूरजचा बारामती आणि संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. "
अजित पवार शेवटी म्हणाले की, "आता आपण सर्वांनी मिळून त्याच्यासाठी घर बांधायचे ठरवले आहे. नवा घरचा प्लान त्याला खूप आवडला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी सूरज स्वतःच्या घरात असेल. हा आपला वादा आहे आणि दादांनी शब्द किती खरा असतो, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. " असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर सभेत केले.
सूरज चव्हाण हा बारामती मोढवे गावमध्ये राहाणार आहे. झापुक-झुपुक म्हणतं त्यांनी महाराष्ट्राच्या मनावर राज्य केलं आहे. नुकतेच त्याच्या घराचे भूमिपूजन पार पडले आहे. आता लवकरच सूरज आपल्या नवीन घरामध्ये जाणार आहे. त्याचे हे नवीन घर पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.