Bigg Boss SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 मधून मुस्कानचा पत्ता कट, सलमान खानने घेतली 'या' सदस्यांची शाळा

Salman Khan Show : 'बिग बॉस 18' च्या घरातून मुस्कान बामने बाहेर पडली आहे. तर सलमान खानने घरातील सदस्यांची शाळा घेतली आहे. नेमकं प्रकरण काय जाणून घ्या.

Shreya Maskar

'बिग बॉस 18' चा (Bigg Boss 18) गेम दिवसेंदिवस अधिकच मनोरंजक होत जात आहे. या आठवड्यात तिसरा 'वीकेंड का वार' पार पडणार आहे. वीकेंड का वारला कोण घरातून बाहेर जाणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

बिग बॉसच्या तिसऱ्या आठवड्यात चाहत पांडे, तजिंदर सिंग आणि मुस्कान बामने यांची नावे नॉमिनेशनमध्ये होती. बिग बॉसने घरातील सदस्यांना कोण घरातून गेल पाहिजे असे विचारण्यात आलं तेव्हा सर्वांनीच मुस्कानचं नाव घेतलं. बिग बॉसच्या गेमनुसार ज्या सदस्यांचे नाव जास्त वेळा इतर सदस्यांकडून घेतले जाणार त्या स्पर्धकाला बिग बॉसच्य घरातून बाहेर पडाव लागते. यामुळे बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात मुस्कान बामने (Muskan Bamne) घराबाहेर पडली. मुस्कान घराबाहेर पडल्यामुळे अनेक नेटकऱ्यांना देखील आनंद झाला आहे. त्यांच्यामते ती गेममध्ये सक्रिय नव्हती.

'वीकेंड का वार' ला सलमान खान (Salman Khan) अविनाश मिश्रा (Avinash Mishra) आणि करणवीर मेहराची (Karan Veer Mehra) शाळा घेताना पाहायला मिळणार आहे. कारण या दोघांनी बिग बॉसच्या घरात शिवीगाळ केली होती. सलमान खान अविनाशला रागवताना पाहायला मिळत आहे. सलमान रागवून अविनाशला बोलतो की, "तू घराचा देव आहेस का? तुझे नाव अविनाश आहे पण तू स्वतःचा नाश करशील..." 'वीकेंड का वार'ला सलमान खान अजून कोणाची शाळा घेणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. चाहते 'वीकेंड का वार'साठी नेहमीच आतुर असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

Heart Health: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'चा 4800 कोटींचा घोटाळा, कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

SCROLL FOR NEXT