Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

सलमानने पाठ फिरवताच 'Bigg Boss 18'च्या घरात शिवीगाळ, करणवीर-अविनाश पुन्हा भिडले, पाहा VIDEO

Avinash-Karanveer Fight : बिग बॉसच्या घरात पुन्हा करणवीर आणि अविनाशमध्ये भांडण झाल्याचे पाहायला मिळत आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

Shreya Maskar

सध्या 'बिग बॉस 18' च्या (Bigg Boss 18) घरात गेम ऐवजी भांडणे, मारामारी पाहायला मिळत आहे. रोज एक नवीन राडा होत आहे. शनिवारी झालेल्या 'वीकेंड वार' ला (Weekend Ka Vaar) सलमानने सदस्यांची शाळा घेतलेली पाहायला मिळाली आहे. मात्र आता बिग बॉसच्या घरात हद्द पार गोष्टी झाली आहे. चक्क बिग बॉसच्या घरात सदस्य एकमेकांना शिव्या घालत आहेत.

बिग बॉसच्या घरात आता नवीन वादाला सुरूवात झाली आहे. करणवीर मेहरा आणि अविनाश मिश्रा यांच्यात पुन्हा राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. ती दोघ एकमेकांना शिवीगाळ देखील करतात. याचा व्हिडिओ बिग बॉसने शेअर केला आहे. सलमानचा 'वीकेंड वार' झाल्यानंतर पुन्हा अविनाश ( Avinash Mishra ) आणि करणवीरमध्ये (Karanveer Mehra) मोठे भांडण होताना दिसत आहे.

बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, अविनाश म्हणतो की, मित्रा काम पूर्ण केल्यावर तुला ते पास करावं लागेल. यावर करण खोचक उत्तर देतो की, टेन्शन घेऊ नकोस! घरातून जाण्या आधी तू सर्व शिकून जाशील, पापा आले आहेत. हे ऐकताच अविनाश खूप रागवतो आणि त्यांच्यात वाद सुरू होतो. त्यांच्यातील हा वाद हाणामारीपर्यंत पोहचतो. घरातील इतर सदस्य हा वाद थांबवण्याचा प्रयत्न करतात पण ही दोघ कोणाचे देखील ऐकत नाही. एकमेकांना शिवीगाळ देखील करतात. आता बिग बॉस यांना काय शिक्षा सुनावणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT