Bigg Boss 18 CANVA
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18: 'दिग्दर्शकाने सर्वांसमोर माझ्यासोबत...', त्या वादावर शहजादाने बिग बॉसच्या घरात सोडले मौन

Shehzada Dhami in Bigg Boss 18: बिग बॉसच्या १८व्या सीझनला सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या घरामध्ये 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम शहजादा धामी याची धमाकेदार एन्ट्री झाली आहे. शुटिंग दरम्यान घडलेल्या घटनेचा किस्सा शहजादाने प्रेक्षकांना सांगितला.

Saam Tv

'कलर्स'वरील सुप्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसच्या १८व्या सीझनला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉसच्या १८व्या सीझनची घोषणा केली होती. प्रेक्षकांमध्ये बिग बॉसबद्दल भरपूर उत्सुकता पाहायला मिळाली होती. काल म्हणजेच ६ ऑक्टोबरला बिग बॉसचा ग्रँड प्रिमियर सोहळा पार पडला. बिग बॉस १८च्या ग्रँड प्रिमियरला बॉलिवूडचा भाईजान किंग खानची जबरदस्त एन्ट्री पाहयला मिळाली.

बिग बॉस १८ला ६ ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. यंदा बिग बॉसच्या घरामध्ये अनेक सदस्यांची धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळाली. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील अरमान म्हणजेच अभिनेता शहजादा धामी यांनी बिग बॉसच्या घरामध्ये एन्ट्री घेतली आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या शोच्या निर्मात्यांसोबत शहजादा धामी याचा वाद झाला होता.

शहजादा धामी आणि मालिकेच्या निर्मात्यांमध्ये इतक्या टोकाचा लाद झाला की त्यांनी शहजादाला मालिकेतून काढून टाकले. त्यानंतर देखील मालिकेच्या निर्मात्यांसोबत शहजादाचा बराच वाद झाला होता. बिग बॉसच्या मंचावर शहजादाने या वादाबद्दल त्याचे मौन सोडले. सलमान खानकडून शहजादाला तो वाद नेमकं कोणत्या कारणांमुळे झाला? असं विचारले. त्यावर शहजादा म्हणाला की, 'मी अगदी आनंदानी मालिकेच्या शुटिंगला जायचो. परंतु एक दिवस मला तातडीने एका मिटिंगसाठी बोलवण्यात आलं. त्यानंतर संपूर्ण शो युनिटसमोर दिग्दर्शकाने माझ्यासोबत सभ्य भाषेत बोलले. त्यानंतर क्रिएटिव्ह डायरेक्टरने मला कोणत्याही प्रकारचे ब्रेसलेट घालू नकोस असे सांगितले कारण त्या मालिकेत मी वकिलाची भूमिका साकारत होतो.'

शहजादा पुढे म्हणाला, 'तो ब्रेसलेट काढायला विसरला होता, म्हणून जेव्हा त्याचा सीन आला तेव्हा त्याने सीनच्या आधी ब्रेसलेट काढून टाकला. त्याला असे करताना पाहून दिग्दर्शकाने त्याच्यावर ओरडले. शॉट संपल्यानंतर मी डायरेक्टरकडे गेलो. मी त्याचं ऐकावं असं दिग्दर्शकाला वाटत होतं. दिग्दर्शकाने माला सांगितले की, 'मी एकच गोष्टी पुन्हा सांगत नाही; मी फक्त एकदाच सांगतो आणि दुसऱ्यांदा माझा संयम सुटतो.' यावर मी म्हणालो की तुम्ही माझ्याशी असे बोलल्यावर मी तुमचं ऐकणार नाही. नंतर मीटिंग बोलावून निर्मात्याने मला टार्गेट केले. तसेच, प्रॉडक्शन टीमचा एक सदस्य दारूच्या नशेत होता आणि त्याने मला विचारले की, 'निर्माते सेटवर पोहोचल्यावर त्यांना अभिवादन करण्यासाठी मी का उभा राहिलो नाही.'

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi Ladoo: लहान मुलं मेथीचे लाडू खायला नकार देतात? मग 'ही' ट्रिक वापरा आणि पाहा जादू!

Bluetooth Security: ब्लूटूथ हेडफोन, इअरबड्स वापरणाऱ्या मोठा धोका, सरकारने जारी केला इशारा

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

SCROLL FOR NEXT