Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Bigg Boss 18' च्या घरातून 'या' सदस्याची एक्झिट, कोण झालं सुरक्षित?

Shehzada Dhami : प्रत्येक 'वीकेंड का वार' ला मनोरंजनाचा धमाका होतो. तर मग बिग बॉसच्या घरातून 'या' आठवड्याला कोण घराबाहेर पडले आहे जाणून घ्या.

Shreya Maskar

'बिग बॉस 18' ची (Bigg Boss 18) सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. प्रत्येक दिवशी रोज नवीन राडा होत आहे. या आठवड्यात 'वीकेंड का वार' खूप खास होणार आहे. कारण हा 'वीकेंड का वार' दिवाळी स्पेशल असणार आहे.

'बिग बॉस 18' च्या घरातून या आठवड्यात सात सदस्य नॉमिनेट झाले होते. त्यातील एका सदस्याची घरा बाहेर एक्झिट झाली आहे. या आठवड्यात अविनाश, ईशा,एलिस, श्रुतिका, अरफीन, शहजादा आणि शिल्पा हे सदस्य नॉमिनेट झाले होते. यातील शहजादा धामी (Shehzada Dhami) आज घराच्या बाहेर गेला आहे. शहजादा धामी घराबाहेर जाण्याच्या निर्णयावर प्रेक्षकही सहमत असताना दिसत आहे. कारण बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांना शहजादा धामीचा खेळ कुठेच दिसला नव्हाता.

चौथ्या आठवड्याच्या नॉमिनेशनमध्ये ज्या सदस्याला नॉमिनेट केलं जाणार होत त्यांना करंटचा झटका दिला होता. नॉमिनेशनच्या वेळी चुम दरांगला कन्सेशन प्रक्रियेतून बाहेर काढले गेले कारण तिला ज्या सदस्याला नॉमिनेट करायचे होते त्याची माफी मागितली त्यामुळे बिग बॉसने तिच्याकडून नॉमिनेट करण्याचे अधिकार काढून घेतले. हा टास्क खूपच छान रंगला होता.

बाकी सर्व सदस्य सुरक्षित झाले आहेत. या आठवड्यात घराचा नवा 'टाइम गॉड' विवियन झाला आहे. विवियनने रजत दलाल आणि श्रुतिकाला जेलमध्ये टाकले आहे. आता 'वीकेंड का वार'ला सलमान खान कोणाची शाळा घेणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi double killing case : काका-पुतण्याला गोळ्या झाडून संपवल्याने खळबळ; दुहेरी हत्याकांडाचं धक्कादायक कारण आलं समोर

PM Modi Rally in Maharashtra : नरेंद्र मोदींचं 'मिशन महाराष्ट्र'; प्रचाराचा धडाका, कधी आणि कुठे होणार सभा?

Raj Thackeray: म्हणून मला मंत्रिपद मिळालं, राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेवर रामदास आठवले यांनी दिलं प्रत्युतर

Maharashtra Politics : बारामतीत पवार कुटुंबीयांचे यंदा दोन पाडवे का? अजितदादांनी सांगितलं कारण,VIDEO

Maharashtra News Live Updates : लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये मुहूर्त ट्रेडिंग

SCROLL FOR NEXT