Amruta Khanvilkar : दिवाळीच्या मुहूर्तावर अमृतानं दाखवलं नवं घर, 'चंद्रा'च्या घराचं unique नाव वाचलं का?

Amruta khanvilkar New House : मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतेच नवीन घर घेतले आहे. ही बातमी तिने आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे.
Amruta khanvilkar New House
Amruta Khanvilkar SAAM TV
Published On

सर्वांची आवडती 'चंद्रा' म्हणजेच अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar ) नेहमीच तिच्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांचे मन जिंकते. नुकतीच तिने सोशल मिडिया एक खास पोस्ट करून तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरचं स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. तिने मुंबईत नवीन घर घेतल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे. आज लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर अमृताने घरात प्रवेश केला आहे. तिच्या आलिशान घराची झलक तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. तिने या पोस्टला एक हटके कॅप्शन देखील दिले आहे. "चला भेट झालीच आपली" म्हणतं मनातील भावना शब्दांमध्ये गुंफल्या आहेत. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये छान कविता लिहिली आहे.

अमृता खानविलकर पोस्ट

"चला भेट झालीच आपली

कधी काळी दूर कुठेतरी तुझं स्वप्न पाहिलं होतं,

आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न रोज सुरू होता

तर हि आपली पहिली दिवाळी…

तुला खूप गोष्टी सांगायच्या आहेत,

मला काय आवडतं, काय नाही,

मनातलं गुपित, शांततेतलं …सारं काही

हळूहळू तुला कळेलच

तुलाही मला खूप काही सांगायचं असेल…

माझी पूर्ण तयारी आहे.

तू अजून हळूहळू आकार घेतोयस,

तुझ्या कानाकोपऱ्यात मी माझं सगळं जग बसवायचा प्रयत्न करतेय.

तू हि अगदी माझ्या हो ला हो म्हणतोयस …

आवडतंय मला …

लवकरच भेटू

नव्या कोऱ्या भिंतींसह

नव्या आठवणी बनवण्यासाठी

नवं आयुष्य उलगडण्यासाठी"

अमृतासाठी हा महिना खूप खास आहे. कारण २३ नोव्हेंबरला अमृताचा वाढदिवस येतो. अमृताने आपल्या नव्या घराच नाव देखील ठेवलं आहे. 'एकम' (EKAM) हे अमृताच्या नव्या घराचे नाव आहे. याचा अर्थ खऱ्या अर्थाने सुरुवात असा आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com