Kashish Kapoor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Kashish Kapoor : 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या घरी चोरी; नोकर ४ लाख रुपये घेऊन फरार, नेमकं प्रकरण काय?

Bigg Boss Actress Kashish Kapoor : बिग बॉस फेम अभिनेत्री कशिश कपूरच्या घरी चोरी झाली आहे. आईला पाठवण्यासाठी ठेवलेले पैसे चोरीला गेले आहेत. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बिग बॉसमुळे अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली. अशीच एक अभिनेत्री म्हणजे कशिश कपूर. 'बिग बॉस 18' फेम कशिश कपूर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकतीच तिच्या घरी चोरी झाल्याची बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीने तिच्या घरी काम करणाऱ्या नोकरावर तब्बल 4 लाख रुपये चोरी केल्याचा आरोप केला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

अभिनेत्री कशिश कपूरच्या (Kashish Kapoor ) घरी तिच्या नोकरानी चोरी केली आहे. कशिशच्या अंधेरीमधील राहत्या घरी ही चोरी झाली आहे. या प्रकरणी कशिशने मुंबईतील अंबोली पोलीस स्टेशनमध्ये तिने याबाबत तक्रार केली आहे. पोलीस या प्रकरणी सध्या शोध घेत आहेत. कशिशच्या घरचा नोकर चोरी करून फरार झाला आहे. नोकराचे नाव सचिन कुमार असे आहे. जवळपास गेल्या 5 महिन्यांपासून तो अभिनेत्रीच्या घरी काम करत होता.

कशिश कपूरने तिच्या आईला पैसे पाठवण्यासाठी घरी तब्बल 7 लाख रुपये ठेवले होते. 9 जुलैला आईला पैसे पाठवण्यासाठी कपाटात पाहिले तेव्हा तिला फक्त 2.5 लाख रुपये मिळाले. तिचे 4.5 लाख रुपये गायब होते. तिने कपाट आणि घरात पैसे शोधले मात्र तिला ते मिळाले नाही. शेवटी तिने आपल्या नोकराला सचिनला पैशासंबंधित विचारल्यावर तो घाबरला आणि फरार झाला. त्यामुळे कशिशला नोकरावर संशय आहे.

कशिश कपूरचा नोकर सकाळी 11.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत काम करून निघायचा. पोलीस सध्या कशिश कपूरच्या घरी काम करणाऱ्या नोकराचा तपास घेत आहेत. कशिश कपूरने अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Designs: साध्या साडीलाही देतील मॉडर्न लूक, ब्लाऊजचे 5 पॅटर्न

Crime: बायकोचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, डोक्यात सिलिंडर घालत नवऱ्याने जागीच संपवलं

Maharashtra Live News Update: जालना जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

Foods To Avoid At Night: रात्री चुकूनही 'हे' ५ पदार्थ खाऊ नका, शरीरासाठी ठरू शकतात घातक

Beed : टॉवर कोसळला अन् डाव मोडला; चोरी करताना दोघांचा दुर्दैवी मृत्यू; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT