Munawar Faruqui Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: मुनव्वर फारुकीच्या विजय रॅलीत ड्रोनचा वापर, डोंगरी पोलिसांनी दाखल केला गुन्हा

Priya More

Munawar Faruqui:

स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकी (Munawar Faruqui) 'बिग बॉस 17'ची (Bigg Boss 17) ट्रॉफी जिंकल्यानंतर डोंगरीला गेला होता. याठिकाणी मुनव्वर फारूकीच्या चाहत्यांनी त्याचे जल्लोषात स्वागत गेले. याठिकाणी मुनव्वर फारुकीची विजय रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. डोंगरी पोलिसांनी याप्रकरणी ड्रोन ऑपरेटरविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

बिग बॉस 17 विजेता मुनव्वर मुंबईच्या डोंगरी (Dongri) परिसरामध्ये राहतो. त्याने बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर 'या शोची ट्रॉफी डोंगरीला घेऊनच येईल' असे आश्वासन चाहत्यांना दिलं होतं. त्याप्रमाणे चाहत्यांना दिलेले आश्वासन मुनव्वरने पूर्ण केले आणि या शोची ट्रॉफी जिंकल्यानंतर मुनव्वर थेट डोंगरीला गेला होता. मुनव्वर डोंगरीमध्ये येताच त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी करत त्याचे स्वागत केले होते. मुनव्वरसोबत फोटो काढण्यासाठी चाहते त्याठिकाणी आले होते. यावेळी मुनव्वरच्या विजय रॅलीचे शूटिंग करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला होता.

डोंगरी पोलिसांनी मुनव्वर फारुकीच्या विजय रॅलीमध्ये ड्रोनचा वापर करणाऱ्या ऑपरेटरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ड्रोन ऑपरेटरने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल डोंगरी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. विना परवाना ड्रोनचा वापर केल्याचे निदर्शनास येताच डोंगरी पोलिसांनी या ऑपरेटरचा ड्रोन कॅमेरा देखील जप्त केला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मुनव्वरला बिग बॉस 17 शो जिंकण्यामध्ये त्याच्या डोंगरीच्या चाहत्यांचा मोठा वाटा असल्याचे म्हटले जात आहे. याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी मुनव्वरला खूप पाठिंबा आणि प्रेम दिले. याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी मुनव्वर ट्रॉफी घेऊन आल्यानंतर त्याचे स्वागत केले. याठिकाणी मुनव्वरची विजय रॅली काढण्यात आली होती. याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मुनव्वरचे स्वागत करण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी या परिसरामध्ये मोठ-मोठे होर्डिंग्स आणि बॅनर देखील लावले होते. मुनव्वरच्या चाहत्यांनी या ठिकाणी ऐवढी गर्दी केली होती की सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले होते.

दरम्यान, बिग बॉस 17 च्या घरामध्ये साडेतीन महिने राहिल्यानंतर अखेर मुनव्वर फारुकीने या शोची ट्रॉफी जिंकूनच दाखवली. मुनव्वर फारुकीने या शोच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. मुनव्वर फारुकीला या शोच्या ट्रॉफीसोबत 50 लाख रुपये आणि कार बक्षीस स्वरुपात देण्यात आली. हा शो जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीने सोशल मीडियावर पोस्ट करत सलमान खानचे आभार मानले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Astrology Tips : काही केल्या लग्न जुळत नाहीये? वास्तुशास्त्रात दिलेले 'हे' उपाय एकदा करून तर पाहा

Nashik News: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने वसतिगृहातच संपवलं जीवन; धक्कादायक घटनेनं नाशिकमध्ये खळबळ

Viral Video: डॉक्टर्स ब्रेन ट्यमूर काढत होते, महिला रुग्ण बघत होती ज्युनियर NTR चा सिनेमा, ऑपरेशन थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबत डेटिंगच्या अफवांवर सौडलं मौन, सांगितला खरा RP कोण?

SCROLL FOR NEXT