Munawar Faruqui Jamal Kudu Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

'बिग बॉस १७'च्या रियुनियन पार्टीत Munawar Faruquiचा Jamal Kudu गाण्यावर धमाल डान्स; सेम टू सेम बॉबी देओलसारखा धरला ठेका

Munawar Faruqui Viral Dance Video: सोशल मीडियावर 'बिग बॉस १७'चा विजेता मुनव्वर फारूकीचा डोक्यावर बॉटल ठेवलेला, सेम टू सेम बॉबी देओलसारखा 'जमाल कुडू' गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Munawar Faruqui Jamal Kudu Viral Video

गेल्या काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस'चा १७ वा सीझन पार पडला. या सीझनचा स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेता मुनव्वर फारूकी ठरला. ग्रँड फिनालेच्या काही दिवसानंतर 'बिग बॉस १७'च्या घरातील सर्व स्पर्धक रियुनियन पार्टीसाठी एकत्र भेटले. यावेळी सर्वच बिग बॉस स्पर्धक धम्माल मस्ती करताना दिसले.

अशातच सध्या सोशल मीडियावर 'बिग बॉस १७'चा विजेता मुनव्वर फारूकीचा डोक्यावर बॉटल ठेवलेला, सेम टू सेम बॉबी देओलसारखा 'जमाल कुडू' गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (Bigg Boss)

सध्या मुनव्वर फारूकीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नुकतंच इन्स्टंट बॉलिवूड या पापाराझी चॅनलने हा व्हिडीओ शेअर केलेला आहे. व्हिडीओमध्ये मुनव्वर फारूकीने ब्लॅक शर्ट आणि जीन्स वेअर केलेली दिसत आहे. अभिनेत्याने डोक्यावर पाण्याची बॉटल ठेवत अगदी सेम टू सेम बॉबी देओलसारखा 'जमाल कुडू' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड भावला असून त्याच्या डान्सचे सर्वांनीच तोंडभरून कौतुक केले आहे. (Bollywood)

या व्हिडीओमधील डान्सचे चाहते कौतुक करीत आहेत. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी ५० हजारांहून अधिक चाहत्यांनी लाईक्स केले आहेत. त्यासोबतच यावेळी बाकी 'बिग बॉस १७'मधील स्पर्धकही होते. अंकिता लोखंडे,विकी जैन, मन्नारा चोप्रा, ईशा मालविय, अभिषेक कुमार सह सर्वच स्पर्धकांनी यावेळी उपस्थिती लावली होती. 'बिग बॉस १७'चे अँथम सॉंग लावत 'बिग बॉस १७' मधील सर्वच स्पर्धकांनी त्या गाण्यावर एकच ठेका धरला. सध्या त्यांची ही धम्माल मस्ती करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. (Viral Video)

'बिग बॉस १७'मध्ये अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा आणि अरुण महशेट्टी हे पाच फायनलिस्ट मिळाले होते. यातून मुनव्वर फारुकी आणि अभिषेक कुमार या दोघांमध्ये फायनलमध्ये चुरस रंगली होती. अभिषेक कुमारला पहिला रनरअप ठरला होता. तर मुनव्वर फारूकीने 'बिग बॉस १७'च्या विजेतेपदाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. मुनव्वरला रत्नजडित ट्रॉफी, 50 लाख रुपयांचा चेक बक्षीस स्वरुपात आणि कार देखील गिफ्ट म्हणून त्याला मिळाली. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

SCROLL FOR NEXT