Bigg Boss 17 Winner Munawar Faruqui Saam Tv
मनोरंजन बातम्या

'ट्रॉफी डोंगरीला आलीच...', 'बिग बॉस 17'ची ट्रॉफी जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीची पोस्ट चर्चेत, 'या' व्यक्तीचे मानले आभार

Bigg Boss 17 Grand Finale: मुनव्वर फारुकीने (Munawar Faruqui) या शोच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. मुनव्वर फारुकीला या शोच्या ट्रॉफीसोबत 50 लाख रुपये आणि कार बक्षीस स्वरुपात देण्यात आली.

Priya More

Bigg Boss 17 Winner Munawar Faruqui:

गेल्या साडेतीन महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त रियालिटी शो 'बिग बॉस 17'चा (Bigg Boss 17) धमाकेदार ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. हा शो 28 जानेवारीला संपला. या शोची सगळीकडे चांगलीच चर्चा रंगली होती. 'बिग बॉस 17'चा विनर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

अखेर ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने (Salman Khan) या शोच्या विनरची घोषणा केली. मुनव्वर फारुकीने (Munawar Faruqui) या शोच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. मुनव्वर फारुकीला या शोच्या ट्रॉफीसोबत 50 लाख रुपये आणि कार बक्षीस स्वरुपात देण्यात आली. हा शो जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीने सोशल मीडियावर पोस्ट करत एका खास व्यक्तीचे आभार मानले आहे.

सलमान खानचा वादग्रस्त शो बिग बॉस 17 तब्बल साडेतीन महिन्यांच्या प्रवासानंतर रविवारी संपला. या सीझनमध्ये एकूण 17 स्पर्धक होते. त्यापैकी पाच स्पर्धकांना प्रेक्षकांनी भरभरून मते देऊन अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले. बिग बॉस 17 ला अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा आणि अरुण महशेट्टी हे पाच फायनलिस्ट मिळाले होते. या पाच जणांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. शेवटी प्रचंड मतांनी मुनव्वर फारुकी या सीझनचा विजेता ठरला. मुनव्वरने या शोची ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याचे चाहते खूपच आनंदी झाले. सध्या सोशल मीडियावर मुनव्वरचे चाहते आणि सेलिब्रिटी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

बिग बॉस सीझन 17ची ट्रॉफी जिंकल्यानंतर मुनावर फारुकीने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आणि एका खास व्यक्तीचे मार्गदर्शन केल्याबद्दल आभार मानले आहे. मुनव्वर फारुकीचा 28 जानेवारीला वाढदिवस होता. त्याच दिवशी या शोचा ग्रँड फिनाले पार पडला. वाढदिवसाच्या दिवशीच हा शो जिंकणे ही त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बिग बॉस 17 ची ट्रॉफी जिंकून मुनव्वर फारुकीने वाढदिवशी स्वत:ला मोठं गिफ्ट दिलं आहे.

बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर मुनावर फारुकीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांचे मनापासून आभार मानले. बिग बॉस 17 च्या घरातून बाहेर आल्यानंतर त्याने सलमान खानसोबतचा फोटो शेअर केला. सलमान खानसोबत या फोटोमध्ये मुनवर फारुकी बिग बॉस 17 च्या ट्रॉफीसोबत पोज देताना दिसत आहे.

मुनव्वर फारुकी जेव्हा बिग बॉसच्या घरात आला तेव्हा त्याने सांगितले होते की, 'या शोची ट्रॉफी डोंगरीलाच जाईल.' आता बिग बॉस 17 ची ट्रॉफी जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीने चाहत्यांचे आभार मानले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'जनतेचे खूप खूप आभार. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे ट्रॉफी अखेर डोंगरीमध्ये आलीच. मला खूप पाठिंबा आणि मार्गदर्शन केल्याबद्दल सलमान खान सरांचे आभार.' मुनव्वर फारुकीच्या या पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

Deepa Parab: मन झालं बाजिंद, ललकारी ग...

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

SCROLL FOR NEXT