Munawar Faruqui Saam Tv
मनोरंजन बातम्या

हुक्का पार्लरवर मुंबई पोलिसांचा छापा, Munawar Faruqui ला पोलिसांनी घेतलं ताब्यात; नेमकं प्रकरण काय?

Munawar Faruqui Detained By Mumbai Police: मुंबईतील एका हुक्का पार्लरवर छापा टाकून मुंबई पोलिसांनी मुनव्वर फारुकीला ताब्यात घेतलं होतं. त्याच्यासह अन्य १३ जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ही घटना मंगळवार २६ मार्च रोजी रात्री घडली.

Priya More

Bigg Bos 17 Winner Munawar Faruqui:

'बिग बॉस १७' चा (Bigg Boss 17) विनर मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) सध्या चर्चेत आला आहे. मुनव्वर फारुकीसह १३ जणांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ताब्यात घेतलं होतं. मुंबईतील एका हुक्का पार्लरवर पोलिसांनी रेड टाकली होती. यावळी पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या १३ जणांची चौकशी केली त्यानंतर सर्वांना सोडून दिलं.

मिळालेल्या माहितीनुसार, नुकताच मुंबईतील एका हुक्का पार्लरवर छापा टाकून मुंबई पोलिसांनी मुनव्वर फारुकीला ताब्यात घेतलं होतं. त्याच्यासह अन्य १३ जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ही घटना मंगळवार २६ मार्च रोजी रात्री घडली. मात्र चौकशीनंतर मुनव्वर फारुकीला सोडून देण्यात आले. यानंतर काही वेळातच मुनावर फारुकीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मुंबई एअरपोर्टवरील फोटो शेअर केले.

मुंबई पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी बोरा बाजारातील सबलन हुक्का पार्लरवर छापा टाकला. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, 'आमच्या टीमला तेथे हुक्क्याच्या नावाखाली तंबाखूचा वापर होत असल्याची माहिती मिळाली होती. हर्बल हुक्क्याच्या नावाखाली तंबाखूचा हुक्का वापरला जात होता. त्यांनी तंबाखूचा हुक्का वापरल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्यावर सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले जातील.'

छापेमारीत हुक्का बारमधून जे काही सामान जप्त करण्यात आले त्याची चौकशी करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या मुनव्वर फारुकीसह १३ जणांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले. 'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, मुनव्वर फारुकीविरोधात सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा, २००३ किंवा COTPA, २००३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

छापा टाकला त्यावेळी मुनावर फारुकी हा हुक्का पार्लरमध्ये उपस्थित होता. नंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. जी पॉझिटिव्ह आली आणि गुन्हा दाखल करण्यात आला. पण चौकशी केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. यासंदर्भात मुनव्वर फारुकीने अद्याप काहीच माहिती समोर आलेली नाही. या घटनेनंतर त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर मुंबई एअरपोर्टवरील फोटो शेअर करत त्यावर प्रवास करत असल्याचे लिहिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhangar Reservation : आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; सुसाईड नोट आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

Diwali 2025 Don't Do: लक्ष्मीपूजनच्या रात्री चुकूनही करू नका 'ही' कामं; देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, नेमकं प्रकरण काय?

ISRO Recruitment: इस्त्रोमध्ये नोकरीची संधी; पगार १.७७ लाख रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT