TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम जेनिफरला मिळाला न्याय, असित मोदींविरोधातील लैंगिक छळाची केस जिंकली

Jennifer Mistry On Asit Modi: या मालिकेमध्ये तिने श्रीमती रोशन सोधी यांची भूमिका साकारली होती. जेनिफर आता या शोचा भाग नाही. गेल्या वर्षी तिने या मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत एफआयआर दाखल केली होती.
Jennifer Mistry And Asit Modi
Jennifer Mistry And Asit ModiSaam Tv
Published On

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah :

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (TMKOC) या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल (Jennifer Mistry) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या मालिकेमध्ये तिने श्रीमती रोशन सोधी यांची भूमिका साकारली होती. जेनिफर आता या शोचा भाग नाही. गेल्या वर्षी तिने या मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत एफआयआर दाखल केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता या प्रकरणी कोर्टाचा निर्णय आला असून जेनिफरने असा दावा केला आहे की, 'असित मोदी यांच्यावर 30 लाख रुपये कर्ज आहे.' अहवालात म्हटले आहे की, न्यायालयाचा निर्णय जेनिफरच्या बाजूने आला असून तिला 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. स्वत: अभिनेत्री जेनिफरने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

ETimes च्या वृत्तानुसार, जेनिफरने स्वत: न्यायालयाच्या या निर्णयाची माहिती दिली आहे. तिने सांगितले की, 'या प्रकरणाचा निर्णय तिच्या बाजूने आला आहे. माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना ठोस पुराव्यानिशी पुष्टी मिळाली आहे.' जेनिफर पुढे म्हणाली की, 'न्यायालयाने असित मोदीला 5 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.' याशिवाय असित मोदी यांच्यावर आधीच जेनिफरचे काही पैसे आहेत. जे एकूण 25 ते 30 लाख रुपये आहेत. अभिनेत्रीने सांगितले की, 'असित यांन छळ केल्याबद्दल 5 लाख रुपयांचा अतिरिक्त दंड ठोठावण्यात आला होता. परंतु अद्याप त्यांच्याकडून कोणतेही पैसे मिळालेले नाहीत.'

जेनिफरने पुढे सांगितले की, 'हा निर्णय 15 फेब्रुवारी 2024 रोजी आला होता. परंतु तिला मीडियासोबत शेअर न करण्यास सांगितले होते. कोर्टाच्या निर्णयाबाबत जेनिफर म्हणाली, 'मला विश्वास आहे की स्त्रीची प्रतिष्ठा सर्वात जास्त महत्त्वाची असते. 40 दिवसांहून अधिक दिवस झाले आहेत आणि मला अजूनही माझे पैसे मिळालेले नाहीत. जी मी मालिकेसाठी (TMKOC) जास्त मेहनत करून मिळवली आहे. मोदींवर लैंगिक छळाचा गुन्हा सिद्ध होऊनही तिन्ही आरोपींना शिक्षा झालेली नाही.

Jennifer Mistry And Asit Modi
Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'मडगांव एक्सप्रेस' सुसाट, 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाची कमाई किती?

'या निर्णयात सोहिल आणि जतीन यांच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे माझी निराशा झाली आहे. स्थानिक समितीने माझ्या योग्य रकमेचा आदेश दिला. या निर्णयामुळे हे स्पष्ट होते की, माझे प्रकरण बनावट नव्हते आणि मी स्वस्त लोकप्रियता शोधत नव्हते. माझे पैसे अद्याप मिळालेले नाही. माझी थकबाकी एक वर्षाहून अधिक काळापासून देण्यात आलेली नाही. ही केस जिंकूनही मला अजून न्याय मिळालेला नाही.', अशी खंत जेनिफरने व्यक्त केली आहे.

Jennifer Mistry And Asit Modi
Pravin Tarade: 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटासंदर्भातील प्रवीण तरडेची पोस्ट चर्चेत, म्हणाला...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com