Pravin Tarade: 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटासंदर्भातील प्रवीण तरडेची पोस्ट चर्चेत, म्हणाला...

Pravin Tarade On Swatantrya Veer Savarkar Movie: मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडेने (Pravin Tarade) नुकताच 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्याची ही पोस्ट चर्चेत आली आहे.
Pravin Tarde On Swatantrya Veer Savarkar Film
Pravin Tarde On Swatantrya Veer Savarkar FilmSaam Tv

Swatantrya Veer Savarkar Film:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) स्टारर 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट (Swatantrya Veer Savarkar Movie) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट रिलीज होऊन ४ दिवस झाले. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट संथगतीने कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक जण सोशल मीडियावर पोस्ट करत हा चित्रपट कसा वाटला याबाबत प्रतिक्रिया देत आहेत. अशामध्ये अनेक सेलिब्रिटींनी या चित्रपटाबाबत पोस्ट केल्या आहेत. मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडेने (Pravin Tarade) नुकताच 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्याची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

प्रवीण तरडेने आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर या चित्रपटासंदर्भात पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने चित्रपटाचे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, '॥ धर्मो रक्षति रक्षित:॥ अफाट अचाट आयुष्य जगलेल्या, जातीपातीला गाडण्यासाठी झटलेल्या, महान व्यक्तीमत्वाची प्रेरणादायी गोष्ट. ताबडतोब बघावा असा तडाखेबंद सिनेमा.' या पोस्टद्वारे त्याने प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.

प्रवीण तरडेच्या या पोस्टवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, 'आपल्यासारख्या आघाडीच्या अभिनेत्याने सावरकर चित्रपट पाहण्याचे आवाहन केलेले पाहून आपल्या विषयीचा अभिमान अजून वाढला आहे.' दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, 'खूप अभिमान वाटत आहे तुमचा दादा.. चला माझ्या एका मराठी कलाकाराने, दिग्दर्शकाने पोस्ट केली या चित्रपटाबद्दल.. खूप खुप धन्यावाद.. जबरदस्त फिल्म आहे सर्वांनी आवर्जून पाहण्यासारखे आहे.' तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, 'मराठी कलाकारांकडून अपेक्षा होती की कोणीतरी पुढे येऊन हिंमत करेल. ती आपण सार्थ ठरवली.'

दरम्यान, 'स्वातंत्रवीर सावरकर' या चित्रपटामध्ये रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेमध्ये आहे. त्याने स्वातंत्र्यवीर सावरकारांची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे देखील या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अंकिता लोखंडे बऱ्याच वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. तिने या चित्रपटामध्ये सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट २२ मार्चला रिलीज झाला. या चित्रपटामध्ये रणदीप हुड्डाने अभिनयासोबत दिग्दर्शनाची जबाबदारी देखील स्वीकारली आहे. त्याचसोबत या चित्रपटाचा सह-लेखन आणि सह-निर्मिती देखील त्याने केली आहे. या चित्रपटासाठी रणदीप हुड्डाने खूपच मेहनत घेतली आहे. या चित्रपटासाठी त्याला प्रचंड बॉडी ट्रान्सफॉर्मेशनही करावं लागलं होतं.

Pravin Tarde On Swatantrya Veer Savarkar Film
Priyanka Chopra ने निक जोनाससोबत देसी स्टाइलमध्ये साजरी केली होळी, डान्सचा VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com