Bade Miyan Chote Miyan चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, अक्षय-टायगरच्या अ‍ॅक्शनने घातला धुमाकूळ

Bade Miyan Chote Miyan Trailer Out: प्रेक्षकांचा उत्साह पाहून चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आज रिलीज केला. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय-टायगर जबरदस्त ॲक्शन करताना दिसत आहेत.
Bade Miyan Chote Miyan Trailer
Bade Miyan Chote Miyan TrailerSaam Tv

Bade Miyan Chote Miyan Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) 'खिलाडी' अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ' (Bade Miyan Chote Miyan Movie) हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाचा टीझर आणि गाणी रिलीज झाल्यापासून या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. प्रेक्षकांचा उत्साह पाहून चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आज रिलीज केला. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय-टायगर जबरदस्त ॲक्शन करताना दिसत आहेत.

'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या निर्मात्यांनी मंगळवारी 26 मार्च रोजी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला. या ट्रेलरमध्ये गोळीबार आणि बॉम्बस्फोटांसोबतच शक्तिशाली ॲक्शन पाहायला मिळत आहे. यामध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ एका वेगळ्या लेव्हलचे स्टंट करताना दिसत आहेत. यामध्ये दोन्ही स्टार्स देशाच्या अशा शत्रूचा खात्मा करण्यासाठी निघाले आहेत. ज्याच्याबद्दल कोणालाही काहीही माहिती नाही. हे शत्रू देशाच्या विनाशाची स्वप्ने पाहत आहेत. अक्षय-टायगरची शत्रूशी लढाई चित्रपटात पाहायला मिळणार आहे. दोघेही आपला जीव धोक्यात घालून देश वाचवण्यासाठी लढत आहेत.

टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार ट्रेलरमध्ये 'दिल से सोलजर दिमाग से शैतान हैं हम..बच के रहना हमसे हिंदुस्तान हैं हम।', असे म्हणताना दिसत आहेत. अक्षय-टायगरची जोडी आपापल्या खास शैलीत शत्रूला हरवण्याचा प्रयत्न करत आहे. पण ट्रेलरच्या शेवटी ही ॲक्शन जोडी एकमेकांची शत्रू बनते. ट्रेलरमध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सोबत, मानुषी छिल्लर आणि सोनाक्षी सिन्हा देखील चमकदार कामगिरी करताना दिसल्या आहेत.

दरम्यान, या चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, आलिया एफ आणि मानुषी छिल्लरशिवाय पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. 10 एप्रिल 2024 रोजी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Bade Miyan Chote Miyan Trailer
Paduka Darshan Utsav: आजच्या घडीला माणसाला संत शिकवणीची गरज, मनोज जोशींनी सांगितलं संत परंपरेचं महत्व

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com