Ankita Lokhande Vicky Jain  INstagram@AnkitaLokhandeJain
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17 Update: पत्नी अंकिताच्या मागे विकी रचतोय कटकारस्थान; 'Weekend Ka Vaar'मध्ये सलमानने केली पोलखोल

Ankita Lokhande - Vicky Jain: बिग बॉसच्या घरामध्ये आल्यापासून अंकिता लोखंडे आणि विकी जैन ही जोडी कायम चर्चेत आहे.

Pooja Dange

Weekend Ka Vaar Salman Khan Scold Contestants:

'बिग बॉस १७' सुरू होऊन दोन आठवडे होत आले आहेत. या दोन आठवड्यात बिग बॉसच्या घरामध्ये अनेक वादविवाद, भांडण पाहायला मिळाली.

बिग बॉसच्या घरामध्ये आल्यापासून अंकिता लोखंडे आणि विकी जैन ही जोडी कायम चर्चेत आहे. या जोडीने बिग बॉसच्या घरामध्ये त्यांचे विश्व निर्माण केले आहे. परंतु या 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान विकी-अंकिताच्या नात्यातील सत्य सर्वांसमोर आणलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'बिग बॉस १७'च्या दुसऱ्या 'वीकेंड का वार'चे शूटिंग पूर्ण झाले आहे. या 'वीकेंड का वार'मध्ये सलमान जास्तच रागात दिसत होता. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमध्ये तुफान राडे झाले. तर सलमानने स्पर्धकांविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत.

'बिग बॉस'मध्ये सर्वात आधी भांडण झालं ते खानजादी आणि अंकितामध्ये. या दोघींच्या भांडणाची चर्चा अनेक दिवस सोशल मीडियावर होत आहे. सलमान खानने या वीकेंड का वारमध्ये सांगितले की या सगळ्याचा मास्टरमाइंड विकी जैन आहे.

सलमान खानने अंकिताला तिच्या 'बिग बॉस'च्या घरातील परफॉर्मन्सविषयी अपडेट दिली. तसेच या खेळात अंकिता तिची ओळख असल्याचे देखील सलमानने सांगितले. विकीविषयी बोलताना सलमान म्हणाला, खानजादीला फूस लावून विकीनेच अंकिताशी भांडण आणले. (Latest Entertainment News)

'नवऱ्यासोबत या खेळात सहभागी होण्याचा निर्णय घेतलास. आता तुझा नवरा खानजादीला तुझ्याशी भांडायला सांगत आहे, असे सलमानने अंकिताला सांगितले. सलमानचे बोलणे ऐकून अंकिताच्या डोळ्यात अश्रू आले.

विकीने स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत म्हटले, 'मी फक्त मस्करी करत होतो.' सलमानने लगेच त्याला टोकलं आणि म्हटलं, 'ती मस्करी नव्हती.' सलमानकडून विकीविषयीचे बोलणे ऐकल्यानंतर अंकिता लोखंडेला तिचे अश्रू अनावर झाले.

'बिग बॉस'च्या घरातून बाहेर जाण्यासाठी ६ स्पर्धकांना नॉमिनेट करण्यात आलं आहे. ऐश्वर्या शर्मा, नील भट, सोनिया बंसल, सनी आर्या, खानजादी, सना रईस खान हे स्पर्धक दुसऱ्या आठवड्यातील नॉमिनेशन लिस्टमध्ये आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT