Vicky Jain Try To Slap Wife Ankita Lokhande Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vicky Jain Slap Ankita Lokhande: बिग बॉसच्या घरात खडाजंगी; रागाच्या भरात विकीने उचलला अंकितावर हात?, नेटकऱ्यांचा संताप

Bigg Boss 17 Latest Promo: अंकिता आणि विकीचा वाद गेल्या काही दिवसांपूर्वी घटस्फोटापर्यंत गेला असल्याची चर्चा सुरु आहे. नुकत्याच झालेल्या वादामध्ये विकीने भांडणामध्ये अंकिता हात उचलला आहे.

Chetan Bodke

Vicky Jain Try To Slap Wife Ankita Lokhande

टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध रिॲलिटी शो 'बिग बॉस १७' (Bigg Boss 17) पहिल्याच दिवसापासून जोरदार चर्चेत आहे. या शोमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती बिझनेसमन विकी जैनने एकत्रित एन्ट्री केली.

अनेकदा त्यांच्यामध्ये आपण वाद होताना पाहिलेले आहे. नुकतंच अंकिता आणि विकीने एकमेकांवर गेम खराब केल्याचा आरोप केला आहे. या शोमध्ये कोणाचे सुत जुळत आहे तर कोणाचे नाते धोक्यात येताना दिसत आहे. अंकिता आणि विकीचा वाद थेट घटस्फोटापर्यंतच गेला आहे. नुकत्याच झालेल्या वादामध्ये विकीने भांडणामध्ये अंकिता हात उचलला आहे.

लेटेस्ट एपिसोडचा प्रोमो 'बिग बॉस तक' च्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन प्रोमो शेअर केला आहे. शेअर केलेल्या ह्या प्रोमोमध्ये, अभिषेक आणि विकीमध्ये काही कारणास्तव वाद होताना दिसत आहे. आणि विकीच्या शेजारी बेडवर बसलेली अंकिता त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. अंकितामुळे अभिषेकला आणि विकीला बोलता येत नाही. त्या दोघांमध्येही अंकिता बोलत असल्यामुळे तिच्यावर विकीने हात उगरला. काहीही विचार नं करता त्याने थेट हात उगरल्यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

विकीचे हे कृत्य पाहून अंकितालाच नाही तर सर्वांनाच शॉक बसला आहे. तिच्यावर हात उगारल्यानंतर लगेचच तिथून विकी उठून निघून जातो. त्यानंतर, अभिषेकला दुसऱ्या बाजूला यायला सांगतो. विकीचे हे कृत्य पाहून 'अरे देवा, हे काय बघायला मिळालं...' अशी प्रतिक्रिया अरुण देतो. सध्या हा प्रोमो एक्स (ट्वीटर)वर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओवर नेटिझन्सने कमेंट करत विकी जैनच्या या कृत्यावरुन त्याला नेटकरी प्रचंड ट्रोल करीत आहेत.

बिग बॉसच्या घरात विकी आणि अंकिता यांच्यात अनेकदा भांडणे होताना आपण पाहिले आहे. दोघंही बिग बॉसच्या घरामध्ये व्यवस्थित राहावे आणि त्यांचं नातं टिकावं यासाठी दोघांच्या आई सुद्धा आल्या होत्या. त्यानंतर दोघांनी भांडण न करण्याचा निर्णयही घेतला होता. सध्या सोशल मीडियावर अंकिताचा विकी जैनचा घटस्फोट झाल्याची चर्चा होत आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: आंघोळ न करता जेवण बनवणं अशुभ असतं?

Maharashtra Live News Update: भाईंदर पश्चिमेकडील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १८ जुगारी अटकेत

Pranjal Khewalkar: खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणाला नवे वळण, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये नेमकं काय?

Tejaswini Lonari: नथीचा नखरा अन् नऊवारी साडी...; नवरात्री निमित्तानं तेजस्विनीचा मनमोहक लूक, पाहा PHOTO

EPFO News : PF खातेधारकांसाठी खुशखबर! एटीएममधून मिनिटांत काढता येणार पैसे, 'या' तारखेपासून सुरु होणार सेवा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT