Bigg Boss 17 Update Saam TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17 Update: 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानच्या रडारवर कोण येणार अन् कोणाला देणार भाईजान कानमंत्र?

Weekend Vaar: सोशल मीडियावर 'वीकेंड का वार'च्या अपडेट यायला सुरुवात झाली आहे.

Pooja Dange

Bigg Boss 17 First Eleminition:

'बिग बॉस १७' सुरू होईन आता आठवडा होईल. आज पहिला 'वीकेंड का वार' पार पडणार आहे. सलमान खानला पाहण्यासाठी आणि तो कोणाची शाळा घेणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

पहिल्याच आठवड्यात घरात बरच वाद-विवाद, भांडण झाली. आज सलमा खान या सगळ्याचा आढावा घेईल. तसेच त्यांना काय चुकले आणि काय करावे हवे होते हे सांगेल.

'बिग बॉस १७' च्या पहिल्या आठवड्यात 'उडारिया' फेम अभिनेता अभिषेक कुमारचे अग्रेसिव्ह रूप पाहायला मिळाले. त्याने बिग बॉस घरामध्ये यायच्या आधीच भांडण करायला सुरुवात. त्याची कोस्टार ईशासोबत त्याने पहिल्या दिवशी स्टेजवर भांडण केले. त्यानंतर त्याने घरामध्ये सोनिया बंसल, खानजादी, सनी आर्य आणि अरूण माशेट्टी यांच्याशी भांडण केले आहे. अरुण आणि त्याचे भांडण इतके टोकले केले की ते एकमेकांवर थुंकले.

आता सोशल मीडियावर 'वीकेंड का वार'च्या अपडेट यायला सुरुवात झाली आहे. पहिल्या वीकेंडला 'बिग बॉस'च्या घरात राडा पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस तक' या एक्स अकाउंटने अपडेट शेअर करत सांगितले आहे की, या वीकेंडला सलमान खान अभिषेक कुमारची शाळा घेईल. तसेच ईशाला देखील डबल स्टॅन्ड घेतल्यामुळे तिला भरपूर सुनावणार आहे.

'बिग बॉस १७' सुरु झाल्यानंतर पहिल्या दिवशी 'बिग बॉस'ने जाहीर केलं होतं की मी शोसाठी योग्य असलेल्या स्पर्धकाला सपोर्ट करणार. त्यामुळे सगळे स्पर्धक चकित झाले होते. आता या वीकेंडला सलमान खान त्याचा सपोर्ट कोणाला आहे हे सांगेल. सलमान खान अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांना सपोर्ट करेल अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत.

'बिग बॉस'कडे एक वादग्रस्त शो म्हणून पाहिलं जात. हा शो वादग्रस्त असला तरी ती टिक्काच लोकप्रिय देखील आहे. आपले लाडके सेलिब्रिटी खऱ्या आयुष्यात कसे आहेत, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. त्यामुळे या शोचा टीआरपी देखील हाय असतो.

या 'वीकेंड का वार'ला सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या 'गणपत' चित्रपटातील मुख्य कलाकार क्रिती सेनन आणि टायगर 'श्रॉफ वीकेंड का वार'मध्ये येणार आहेत. तर तेजस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री कंगना रनौत देखील येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Accident: भरधाव कारची उभ्या असलेल्या वॅगनआर कारला धडक, टक्कर होताच दोन्ही वाहनांनी घेतला पेट, ५ जणांचा मृत्यू

विधान भवनातील दलालांवर शासनाचा डोळा; शासनाच्या परिपत्रकामुळे दलालांना चाप?

वैद्यकीय चाचणीत कॅन्सर झाल्याचं समजलं; कंपनीनं कर्मचाऱ्याला थेट कामावरुन काढलं, पुण्यातील संतापजनक प्रकार

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? ठाकरे-पवारांचे आमदार फुटणार? VIDEO

Thursday Horoscope : सोनं, पैशांचं घबाड हाती लागणार; ५ राशींचे लोक डाव साधणार

SCROLL FOR NEXT