Bigg Boss 17 Rakhi Sawant on Ankita Lokhande Mother in Law Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: 'कैकेयी बनून घर तोडू नका...'; अंकिता लोखंडेला टोमणे मारणाऱ्या सासूवर भडकली राखी सावंत

Rakhi Sawant On Ankita Lokhande Mother In Law: अंकिता लोखंडेला समर्थन करत बॉलिवूडची 'ड्रामाक्वीन' राखी सावंत विकीच्या आईवर भडकलेली दिसली.

Chetan Bodke

Bigg Boss 17 Rakhi Sawant on Ankita Lokhande Mother in Law

सलमान खानचा (Salman Khan) प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 17'ची (Bigg Boss 17) सध्या ग्रँड फिनालेमुळे जोरदार चर्चा होत आहे. अवघ्या काही दिवसांवरच या शोचा ग्रँड फिनाले येऊन ठेपला आहे.

गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या फॅमिली विकमध्ये विकीला आणि अंकिताला सपोर्ट करण्यासाठी अंकिताची आई आणि विकीची आई बिग बॉसच्या घरामध्ये आल्या होत्या. तेव्हा अंकिताने विकीला लाथ मारल्यामुळे विकीच्या आईने अंकिताची कानउघडणी केली होती.

विकीच्या आईच्या बोलण्याने अंकिताला खूप वाईट वाटलं होतं. आता या 'फॅमिली वीक'नंतर अंकिता लोखंडेला समर्थन करत बॉलिवूडची 'ड्रामाक्वीन' राखी सावंत विकीच्या आईवर भडकलेली दिसली. (Bollywood)

राखी सावंत कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतंच तिने तिच्या सोशल मीडियावर अंकिता लोखंडेसाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखीने अंकिता लोखंडेला सपोर्ट केला असून तिने विकीच्या आईला शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. (Bigg Boss 17)

व्हिडीओमध्ये राखी सावंत म्हणतेय, "हॅलो फ्रेंड्स, मला अंकिताच्या सासूला सांगायचंय की, सासूबाई तुम्ही सुद्धा एकदा सून होत्या. पती-पत्नीमध्ये तुम्ही कशाला 'कबाब मैं हड्डी' होत आहात? तुमच्या मुलाने विकीने अंकितासोबत संसार थाटला आहे. मग तुम्ही कशाला वाद घाल आहात, तुम्ही शांत राहा. मजा करा." (Social Media)

याशिवाय राखी सावंत म्हणाली, "अंकिता 'बिग बॉस १७'ची ट्रॉफी कशीही जिंकेल, ही माझी भविष्यवाणी आहे. यंदाची 'बिग बॉस १७'ची ट्रॉफी मराठमोळी मुलगी अंकिता लोखंडे जिंकणार आहे. त्यावेळी तुमची सून जिंकल्यानंतर तुम्हाला आनंद होणारच ना. तुमच्या मुलाच्या आणि सुनेच्या वादामध्ये तुम्ही काही बोलू नका. आमच्या घरातही नेहमीच भांडणं व्हायचे पण माझी आई कधीही त्या भांडणामध्ये बोलत नव्हती. सूनेचा आदर करा. तर तुमच्या मुलीचाही तिच्या सासरी सन्मान केला जाईल." असं राखी सावंत अंकिताच्या सासूला म्हणाली आहे. (Bollywood Actress)

"आम्ही अंकितावर खूप प्रेम करतो. ती माझी बहीण आहे. मी तुमच्या घरी आली होती, तेव्हा मी तुम्हाला भेटली होती. तुमच्या लक्षात आहे का ? तेव्हा मला तर तुम्ही देवीप्रमाणे वाटत होत्या, असं मध्येच कशा काय इतक्या बदलल्या तुम्ही. आई तुम्ही कैकेयी बनू नका, कुटुंबाला सांभाळून घ्या, कुटुंब तोडू नका." असं राखी सावंत अंकिताच्या सासूला म्हणाली आहे. 'बिग बॉस १७'चा ग्रँड फिनाले या महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. 'बिग बॉस १७'चा विजेता कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT