Ankita Lokhande Shock Vicky Jain Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: अंकिता लोखंडेने पती विकीला दिला 440 व्होल्टचा झटका; इतकं टोकाचं बोलली की बसला शॉक

Ankita Lokhande Shock Vicky Jain Video: पतीचं वागणं आणि सासूचे टोमणे ऐकून अंकिता लोखंडे त्रस्त झाली आहे. तिने पती विकीला 'तुला ब्रेक पाहिजे का?', असा सवाल केला आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Priya More

Ankita Lokhande And Vicky Jain:

'बिग बॉस 17'च्या घरातील सर्वात चर्चेत असलेले कपल म्हणजे अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain). या दोघांनी बिग बॉसच्या घरामध्ये एकत्र एन्ट्री घेतली खरी पण तेव्हापासून त्यांच्या नात्यामध्ये दूरावा आल्याचे चित्र सतत पाहायला मिळत आहे. अंकिता लोखंडे आणि विकीने अनेकदा सोडून जाण्याच्या आणि वेगळं होण्याच्या गोष्टी बोलले आहेत. आता हे कपल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पतीचं वागणं आणि सासूचे टोमणे ऐकून अंकिता लोखंडे त्रस्त झाली आहे. तिने पती विकीला 'तुला ब्रेक पाहिजे का?', असा सवाल केला आहे. बिग बॉसचा लेटेस्ट प्रोमो व्हिडीओमध्ये या पती-पत्नींमधील रुसवे-फुगवे दिसून आले आहेत.

'बिग बॉस 17'च्या लेटेस्ट एपिसोडच्या प्रोमोमध्ये अंकिता लोखंडे उदास आणि खूपच नाराज दिसत आहे. अंकिता तिचा पती विकी जैन याच्यासोबत गार्डन एरियामध्ये बसून गप्पा मारताना दिसत आहे. यावेळी ती म्हणते की, 'मला कोणीही समजून घेऊ शकत नाही.' यावेळी विकी देखील अंकिताकडे तक्रार करू लागतो. त्यावेळी अंकिताने त्याला सल्ला दिला की, 'आपण ब्रेक घेऊया.' अंकिताचे हे बोलणं ऐकून विकीला धक्का बसतो. त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे आहेत.

नवीन प्रोमोमध्ये विकी जैन आणि अंकिता लोखंडे गार्डन एरियामध्ये बसलेले दिसत आहेत. विकी अंकिताच्या केसांशी खेळताना तिला विचारतो की, 'काय गडबड आहे.' यावर अंकिता म्हणते की, 'मी माझ्या नात्याबद्दल विचार करत होती. मी सर्वांसमोर चुकीची सिद्ध होत आहे.' विकीने सांगितले की, 'प्रत्येकजण काय विचार करतो याने काही फरक पडत नाही.' पण अंकिता तिला म्हणते की माझ्यावर परिणाम होतो.

अंकिता लोखंडे म्हणते, 'मी प्रत्येकावर खूप प्रेम केले आणि जर कोणी हा प्रश्न उपस्थित केला तर या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होईल. मला असे वाटते की, मला खरोखर कोणीही समजू शकत नाही. मी दिवसेंदिवस अधिक निराश आणि चिडचिडी होत चालली आहे.' त्यानंतर विकी अंकिताला त्या सर्व गोष्टी सांगायला सुरुवात करतो ज्या त्याला अजिबात आवडत नाही. यावेळी विकी अंकिताला म्हणतो की, 'तुझी विचार करण्याची पद्धत खूप वेगळी आहे.'

यानंतर अंकिता लोखंडे विकाला म्हणते की, 'तुला ब्रेक हवा आहे का?' अंकिता असं काय बोलली हे विकीला अजिबात समजले नाही. पण अंकिताचे हे बोलणं ऐकून विकीला धक्का बसतो. हा प्रोमो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अंकिता आणि विकी शो सोडल्यानंतर एकमेकांना घटस्फोट देऊ शकतात, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, बिग बॉसच्या घरामध्ये अंकिता आणि विकीची बऱ्याचदा भांडणं झाली आहेत. अनेकदा दोघांना एकमेकांना सोडून जाण्याची भाषा देखील केली आहे. अंकिताने विकीला लाथ मारली होती. तर विकीने अंकितावर हात उगारला होता. फॅमिली विगमध्ये अंकिताच्या सासूने याबद्दल नारजी देखील व्यक्त केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT