Vicky Jain Said Sorry To Ankita Lokhande Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: 'सॉरी मंकू माझी चूक झाली...', विक्की जैनने जमिनीवर गुडघे टेकवून मागितली अंकिता लोखंडेची माफी

Vicky Jain Said Sorry To Ankita Lokhande: या शोचा ग्रँड फिनाले 28 जानेवारीला होणार आहे. अंकिता लोखंडे, विकी जैन, मन्नारा चोप्रा, मुनव्वर फारुकी आणि अभिषेक कुमार यांच्या रुपाने या शोला ५ फायनलिस्ट स्पर्धक मिळाले आहेत.

Priya More

Bigg Boss 17 Promo:

प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17'चा (Bigg Boss 17) शेवटचा आठवडा सुरू आहे. या शोच्या ग्रँड फिनालेचे काउंटडाउन सुरू झाले आहे. या शोचा ग्रँड फिनाले 28 जानेवारीला होणार आहे. अंकिता लोखंडे, विकी जैन, मन्नारा चोप्रा, मुनव्वर फारुकी आणि अभिषेक कुमार यांच्या रुपाने या शोला ५ फायनलिस्ट स्पर्धक मिळाले आहेत. नुकताच बिग बॉसच्या घरामध्ये पत्रकार परिषद पार पडली.

या पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांच्या अनेक धारदार प्रश्नांची उत्तर स्पर्धकांनी दिली. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाशी संबंधित आणि सहकारी स्पर्धकांसोबतच्या नात्याबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी सर्वांसमोर विक्की जैनने पत्नी अंकिता लोंखंडेची माफी मागतो. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नुकताच 'बिग बॉस 17'चा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. पत्रकार परिषदेदरम्यान अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांना विचारण्यात आले की शोमध्ये आल्यानंतर कपल थेरपीचा पर्याय निवडतील का? या प्रश्नाला उत्तर देताना विकी जैन म्हणाला, 'ही थेरपी आहे. आता मी गुडघे टेकून तिला सॉरी म्हणेन.' यानंतर विकी जैन जमिनीवर गुडघे टेकवतो आणि पत्नी अंकिता लोखंडेची माफी मागतो. या संपूर्ण सीझनमध्ये अंकिताला दिलेल्या वागणुकीबद्दल विकी माफी मागताना दिसतो.

विकी जैन यावेळी अंकिताला म्हणतो की, 'सॉरी मंकू, माझ्या चुकांसाठी मला माफ कर.' यानंतर विकी जैन म्हणतो, 'कारण मला एक गोष्ट खरी सांगायची आहे. बाहेरही आम्ही दोघंच घरी असतो. त्यावेळेस कदाचित आपल्या चुका कोणी सांगणारं नसतं आणि तुम्हाला ते समजूनही येत नाही.' विकी जैन आपली चूक मान्य करत पुढे म्हणतो की, 'आज पहिल्यांदाच या 100 दिवसांत इतके लोक मला तेच प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे कदाचित मी माझा लुकबॅक करत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित त्यावेळी मला ते खरोखरच कळले नसेल. कदाचित त्यावेळी अशा गोष्टी घडत असतील ज्या अजिबात व्हायला नको होत्या.'

अंकिता देखील विकीने मागितलेली माफी स्वीकारते. विकीने खुलासा केला की, 'मी तसा माणूस नाही आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी अंकिता लोखंडेच्या पाठीशी उभा राहिलो आहे.' तो पुढे म्हणतो, 'मी खूप आभारी आहे की मी इथे फक्त तिच्यामुळेच आलो आहे. हे स्वीकारण्यास मी कधीच मागे हटलो नाही.' तसंच, या प्रवासात तो कसा हरवला आणि त्याच्या नात्याकडे कुठेतरी दुर्लक्ष झाले हे त्याने शेअर केले. विकी पुन्हा अंकिताची माफी मागतो आणि तिला वचन देतो की, 'मी सर्वकाही ठीक करेल.' त्यानंतर अंकिता आनंदी होते आणि त्यांची माफी स्वीकारते. यानंतर अंकिता तिचा पती विकीच्या गालावर किस करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल, स्व. हेमंत करकरे यांच्या आठवणी ताज्या

Mugachi Khichdi Recipe: मऊ, लुसलुशीत मुगाची खिचडी कशी बनवाल?

Ulhasnagar: घराबाहेर पडला अन् टेरेसवर जाऊन स्वत:ला पेटवून घेतलं; उल्हासनगरमध्ये खळबळ

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीचं मुख्य गाभाऱ्यातील दर्शन १० दिवस बंद राहणार! | VIDEO

Bank Jobs: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ३३० पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT