Bigg Boss 17 Promo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात येताच ऐश्वर्या शर्मा झाली डिप्रेशनची शिकार, नेमकं काय होतंय पतीला सांगितलं?

Bigg Boss 17 Promo: बिग बॉसच्या शोचा एक प्रोमो समोर आला असून यामध्ये ऐश्वर्या शर्मा ही डिप्रेशनची शिकार झाल्याचे दिसत आहे.

Priya More

Aishwarya Sharma Cried Video:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त रियालिटी शो 'बिग बॉस'चा १७ वा (Bigg Boss 17) सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सीझनमध्ये १७ स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरामध्ये एन्ट्री घेतली. सध्या हा शो चांगलाच चर्चेत असून प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे.

बिग बॉसच्या घरामध्ये आलेल्या स्पर्धकांमध्ये पहिल्या दिवसापासून भांडणाला सुरूवात झाली आहे. बिग बॉसच्या शोचा एक प्रोमो समोर आला असून यामध्ये ऐश्वर्या शर्मा ही डिप्रेशनची शिकार झाल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

बिग बॉसच्या १७ व्या सीझनमध्ये नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा या कपलने एकत्र एन्ट्री घेतली. बिग बॉसच्या घरामध्ये आल्यापासून ऐश्वर्या डिस्टर्ब आहे. बिग बॉसच्या घरामध्ये आल्यापासूनच ऐश्वर्या शांत शांत दिसते. तिच्यासोबत काय चालले आहे हेच तिला कळत नाही. बिग बॉसन देखील तिला ओरडा दिला होता. त्यानंतर देखील ऐश्वर्या रडली होती. आता ऐश्वर्या आणि नील गप्पा मारतानाचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ते एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कलर्स टीव्ही शो 'बिग बॉस 17'चा प्रोमो व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. त्यात ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दोघेही नाराज दिसत आहेत. ऐश्वर्या शर्माला या शोचा फॉरमॅट समजत नाहीये अस ती बोलताना दिसत आहे. त्यामुळे ती डिप्रेशनची शिकार झाली असल्याचे दिसत आहे. तर नील भट्ट म्हणतो की, 'आपण कंटाळवाणे आहोत हे स्वीकारावे लागेल.' हा प्रोमो पाहिल्यानंतर दोघांचेही चाहते बिग बॉसच्या आगामी भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दरम्यान, 'बिग बॉस 17'च्या या प्रोमोमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यातील वाद पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर अंकिता आणि विकीच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोघांमध्ये सतत काहीना काही कारणांवरून खटके उडत आहेत. अशातच अंकिता लोखंडे ढसाढसा रडल्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. मी एकटी पडली असल्याचे अंकिता विकीला सांगते. त्यानंतर विकी तिला सॉरी बोलतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

SCROLL FOR NEXT