Abhishek Kumar Cried After Isha Malviya Eviction Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना ईशा मालवीयने अभिषेक कुमारची मागितली माफी; ढसाढसा रडला अभिनेता

Abhishek Kumar Cried After Isha Malviya Eviction: ग्रँड फिनालेच्या काही दिवस आधी ईशा मालवीयला या शोमधून बाहेर जावे लागले. ईशा घरातून बाहेर पडताना अभिषेक कुमार ढसाढसा रडला. यावेळी ईशाने गळा भेट घेत अभिषेकची माफी मागितली.

Priya More

Bigg Boss 17 Promo:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 17'च्या (Bigg Boss 17) ग्रँड फिनालेचे काउंटडाउन सुरू झाले आहे. या शोचा ग्रँड फिनाले 28 जानेवारीला होणार आहे. ज्याची तयारी निर्मात्यांनी सुरू केली आहे. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये (Bigg Boss Grand Finale) डबल इविक्शनचा घरातील सदस्यांना झटका मिळाला. सर्वात आधी प्रेक्षकांच्या थेट वोटिंगच्या आधारावर आयशा खानला शोमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर आता ईशा मालवीयचा नंबर आला. ग्रँड फिनालेच्या काही दिवस आधी ईशा मालवीयला या शोमधून बाहेर जावे लागले. ईशा घरातून बाहेर पडताना अभिषेक कुमार ढसाढसा रडला. यावेळी ईशाने गळा भेट घेत अभिषेकची माफी मागितली.

'बिग बॉस 17'च्या या वीकेंड का वारमध्ये या शोला टॉप 5 स्पर्धक मिळाले आहेत. शोच्या शेवटच्या आठवड्यात पोहोचल्यानंतर ईशा मालवीयला बाहेर काढण्यात आले. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना ईशाने अभिषेक कुमारला असे काही सांगितले. ज्यामुळे तो खूपच भावुक झाला. ईशा आणि अभिषेकचे भांडण झाले होते तेव्हा त्याने तिला सांगितले होते की, फिनालेपूर्वी मी तुला टर्नलपर्यंत सोडयला येईल. अभिषकचे हेच शब्द ईशाने घरातून बाहेर पडताना त्याला ऐकवले. ईशाने यावेळी अभिषेकला सांगितले की, 'चल मला टर्नलपर्यंत सोड. तू हे बोलला होता ना.' ईशा गेल्यानंतर गार्डन एरियामध्ये अभिषेक कुमार ढसा-ढसा रडला. त्यानंतर तो बाथरूममध्ये जाऊन देखील रडतो. अभिषेकचे रडणे पाहून त्याचे चाहते काळजीमध्ये पडतात.

अभिषेक कुमारची अवस्था पाहून त्याचे चाहते थोडे भावुक झाले आहेत. एका यूजरने लिहिले की, 'मला वाटत नाही की तो असे नाटक करत आहे. त्याचे ईशावर खरोखर प्रेम होते आणि ती त्याच्या आयुष्याचा भाग नाही हे स्वीकारायला त्याला बराच वेळ लागला. तिच्यासोबत इतका वेळ घालवल्यानंतर तिला पाहत आहे.' दुसर्‍या युजरने लिहिले की, 'तिला सोडून देणे कठीण आहे कारण तो तिला यापुढे पाहू शकणार नाही.' अशाप्रकारच्या अनेक कमेंट्स त्याच्या चाहत्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, बिग बॉस 17 च्या ग्रँड फिनालेआधी चाहत्यांना त्यांच्या टॉप 5 सदस्यांची नावे माहित झाली आहेत. या सीझनमध्ये अभिषेक कुमार, मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, विकी जैन आणि अरुण मशेट्टी हे सदस्य टॉप 5 मध्ये पोहचले आहेत. आता एका स्पर्धकाला या आठवड्याच्या मध्यभागी बाहेर काढण्यात येईल. अरुण मशेट्टी आणि विकी जैन या स्पर्धकांपैकी एकाला यावेळी घराबाहेर जावे लागेल. त्यामुळे आता या दोघांपैकी नेमकं कोण जाणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravana Nakshatra : मकर राशीच्या व्यक्तींचे आयुष्य आणि श्रवण नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचे करिअर जाणून घ्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप, ठाकरेंचे खासदार आणि आमदार महायुतीच्या संपर्कात? भाजपच्या संकटमोचकाचा दावा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त नांदेड शहरातील श्री नरहरी नरसिंह मंदिरात विठ्ठल नामाचा गजर

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT