Ankita Lokhande On Mannara Chopra Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17 New Promo: मन्नारावर विश्वास ठेवू नका कारण ती त्या लायक नाही, अंकिता लोखंडे असं का म्हणाली?

Bigg Boss 17: अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि मन्नारा चोप्रा (Mannara Chopra) यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला असून यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होत आहे.

Priya More

Ankita Lokhande On Mannara Chopra:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो 'बिग बॉस 17'मध्ये (Bigg Boss 17) दिवाळी धमाका पाहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या घरामध्ये रोज सदस्यांमध्ये भांडण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोणाच्या मैत्रीवरून, कोणाच्या प्रेमावरून, कामावरून तर कधी एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे बिग बॉसच्या घरामध्ये सदस्यांमध्ये भांडणं होत आहेत.

अशामध्ये आता अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि मन्नारा चोप्रा (Mannara Chopra) यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला असून यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होत आहे. तर दुसरीकडे, 'UK 07 Rider' उर्फ ​​अनुराग डोवालमुळे सनी आर्या 'तहलका' आणि ईशा मालवीयाचा प्रियकर समर्थ जुरेल यांच्यात खूप भांडण होणार असल्याचे नुकताच समोर आलेल्या प्रोमोवरून दिसत आहे.

'बिग बॉस 17' च्या आजच्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की, अंकिता लोखंडे इतर स्पर्धकांसमोर म्हणत आहे की, 'मन्नाराच्या बोलण्याने प्रभावित होऊ नका, ती कोणत्याही मुलीबद्दल काहीही बोलू शकते. आज ती तुमच्यासोबत असेल तर ती चांगली बोलेल. पण इकडे असेल तर काहीही बोलेल. तिच्यावर विश्वास ठेवू नका, कारण ती विश्वास ठेवण्या लायक नाही.' मजेशीर गोष्ट म्हणजे अंकिताने हे सर्व मन्नारासमोरच सांगितलं. त्यानंतर मन्नारा उठते आणि हात जोडून सर्वांना सांगते, 'ती इथेच आहे.' यावर अंकिताही मागे वळते आणि म्हणते, 'तू आधी साग तुझं सत्य काय आहे.'

मन्नारा चोप्रा उठून तिथून निघून जाते. पण तरीही अंकिता गप्प बसत नाही. ती पुढे म्हणते, 'त्या दिवशी तू खानझादीला कॅरेक्टरलेस म्हणत होतीस. जर कोणी तुझ्या विरोधात गेलं ना मनारा तर तुला राग येतो. त्यानंतर अंकिता लोखंडेचे बोलणे ऐकून मन्नारा हसू लागते. सध्या याच कारणामुळे अंकिता आणि मन्नारा चर्चेत आले आहेत. त्याचा हा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दुसरीकडे अनुराग डोवाल हा समर्थ जुरेलला सर्वांसमोर विचारतो की, 'तहलका, सना आणि तुझ्यासमोर काय झालं ते तू त्यांना कसं सांगितलंस?' अनुरागचे बोलणे नुकतेच संपले होते, तेव्हा 'तहलका' बोलू लागला. तो म्हणतो, 'तू इथे गॉसिप करायला आला आहेस का?' हे ऐकून समर्थ म्हणतो, 'इकडे-तिकडे बोलायचे नसेल तर बाहेर जा.' यानंतर दोघांमध्ये भांडण सुरू होते आणि ते शिवीगाळ करतात. दोघांना थांबवण्यासाठी कुटुंबीयांना मध्यस्थी करावी लागते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: स्पाय कॅमेरा अन् ७४ तरुणींचे प्रायव्हेट व्हिडीओ; विमानातील पायलटचं भयंकर कृत्य

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जन मिरवणुकीत आमदार सतेज पाटील यांचा डान्स

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताची फायलनमध्ये धडक; विरोधीला संघाला पाणी पाजलं

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

SCROLL FOR NEXT