Munawar Faruqui Angry On Mannara Chopra Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: 'आमच्यात माणुसकी नाही...', मनारा चोप्रावर संतप्त होत असं का म्हणाला मुनव्वर फारुकी?

Munawar Faruqui Angry On Mannara Chopra: बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमध्ये टास्कदरम्यान वाद झाला. त्यानंतर बिग बॉसने हा टास्क थांबवण्यास सांगितले. त्यामुळे मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) संतप्त होतो आणि मनारा चोप्राला ओरडतो.

Priya More

Bigg Boss 17 New Promo:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो 'बिग बॉस १७' ला (Bigg Boss 17) सध्या प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्यांमध्ये सतत नवनवीन मुद्द्यांवरून खटके उडताना आणि वाद होताना दिसत आहे. त्यांच्या या वादामध्ये बिग बॉसला देखील अनेकदा हस्तक्षेप करावा लागत आहे.

अशामध्ये आता पुन्हा बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमध्ये टास्कदरम्यान वाद झाला. त्यानंतर बिग बॉसने हा टास्क थांबवण्यास सांगितले. त्यामुळे मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) संतप्त होतो आणि मनारा चोप्राला ओरडतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'बिग बॉस 17'च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये दिसत आहे की घरामध्ये खूप गोंधळ उडाला होता. बिग बॉस स्पर्धकांना एक नवीन टास्क देतो. ज्यामध्ये घरातील सदस्यांना त्यांचे रेशन गोळा करायला सांगितले जाते. हा टास्क सुरू करण्यापूर्वी बिग बॉस घरातील सर्व सदस्यांना गार्डन एरियामध्ये बोलावतो आणि नंतर हा संपूर्ण टास्क समजावून सांगतो. रेशन टास्कमध्ये समर्थ जुरेल, मुनव्वर फारुकी आणि नील भट्ट हे तिघे जण भाजी आणि रेशन चोरतात. ते पाहून मनारा त्यांना बोलताना दिसते. ज्याचा घरातील काही सदस्यांना राग येतो.

नव्या प्रोमोमध्ये असे दिसते की, 'दिमाग का घर'मध्ये राहणारे सदस्य रेशनचे मालक आहेत आणि ते प्रत्येकाला त्यांच्या इच्छेनुसार रेशन घेऊन देतात. मग खेळात ट्विस्ट येतो आणि मुनव्वर फारुकी, नील भट्ट आणि समर्थ जुरेल हे रेशन घेण्यासाठी आधी गोदामात जातात. तिघेही रेशन गोळा करत असतात. तेव्हा मनारा चोप्रा तिथे पोहचते आणि त्यांना इतरांसाठीही काहीतरी सोडण्यास सांगते.

रेशन टास्कमध्ये एक ट्विस्ट देण्यासाठी बिग बॉस हस्तक्षेप करतात आणि मनारा चोप्राला बोलतात की, जर आपण महानतेबद्दल बोलत असलात तर मनारा तुम्हाला पाहिजे तसे होईल.' यानंतर बिग बॉस रेशन टास्क थांबवतात. यानंतर मुनव्वर मनारावर रागावतो आणि म्हणतो, 'आमच्यात माणुसकी नाही असे तुला वाटते का?' फक्त मुनव्वरच नाही तर रिंकू धवनही मनाराला ओरडते आणि म्हणते की, 'तू इथे रिलेशन बनवण्यासाठी आली आहेस का?' त्यानंतर मनारा नाराज झाल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार आणि सुनील तटकरे वर्षा निवासस्थानी आज बैठक पार पडणार

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT