Ankita Lokhande And Vicky Jain Again Fight Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita Lokhande: 'मी तुझ्या आयुष्यातून निघून जाते...', रडत-रडत अंकिता लोखंडेने उचललं टोकाचं पाऊल

Ankita Lokhande And Vicky Jain Again Fight: अंकिता आणि विकीची बिग बॉसच्या घरामध्ये पुन्हा भांडणं सुरू झाली आहेत. अंकिता हात जोडून विकीला म्हणते की, 'मी तुझ्या आयुष्यातून निघून जाते...'. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

Ankita Lokhande And Vicky Jain:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोला लवकरच विनर मिळणार आहे. नुकताच या शोमध्ये फॅमिली वीक एपिसोड पार पडला. त्यानंतर आता बिग बॉसच्या घरामध्ये भारती सिंह आणि हर्ष लिम्बाचिया हे कपल येणार आहेत. घरामध्ये आल्यानंतर हे दोघे घरातील सदस्यांना भिजवून त्यांच्यासोबत मजा-मस्ती करणार आहेत. यावेळी भारती अंकिता आणि विकी यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करताना दिसते. ती सांगते की,'मी खरं सांगत आहे विकी, अंकिता भांडण लांब खेचू नये. म्हणजे एकमेकांना झापड मारा आणि भांडण संपवून टाका.'

नुकताच समोर आलेल्या बिग बॉस 17 च्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, विकी जैन गार्डन एरियामध्ये मन्नारा चोप्रा आणि ईशा मालवीयसोबत गप्पा मारत बसला आहे. त्याचवेळी अंकिता येऊन त्याला सांगते की, 'भांडी पडली आहेत. घासून घे.' त्यावर विकी अंकिताला उत्तर देतो की, 'हे तू मला का सांगत आहेस. आता तू कॅप्टन नाही आहेस.' तिथूनच अंकिता आणि विकी यांच्यामध्ये पुन्हा भांडणाला सुरूवात होते.

अंकिताला विकीचे हे असं बोलणं अजिबात आवडत नाही आणि ती म्हणते, 'ही बोलण्याची कोणती पद्धत आहे.' तेव्हा विकी तिला म्हणतो की, 'तू मर्यादा ओलांडल्या आहेत. तू माझ्याशी नीट बोलली नाही.' तेव्हा अंकिता त्याला म्हणते की, 'आजकाल विकी तुला काय झाले आहे माहिती नाही. सतत फक्त भांडण करतोस.' तर विकी तिला उत्तर देतो की, दोन लोकांसमोर मला लाजवण्याचा हा कोणता प्रकार आहे हे मला माहीत नाही.'

त्यानंतर अंकिता हात जोडते आणि विकीकडे माफी मागत म्हणते की, 'मला तुझ्याशी बोलण्याची इच्छा नाही. मी जात आहे तुझ्या आयुष्यातून... तेव्हा तू बघून घे की तुला काय करायचे आहे.' दरम्यान, यावेळी बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे या आवठवड्यामध्ये एक किंवा दोन सदस्यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपेल. या आठवड्यामध्ये मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, विकी जैन, अरुण माशेट्टी, आयशा खान, मन्नारा चोप्रा आणि ईशा मालवीय घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. यांच्यापैकी घरातून कोण बाहेर जाणार आहे हे या आठड्यात कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT