36 Guni Jodi Serial Timing Changes Netizen Get Angry Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vijay Singh Revealed People Abuse: 'मला शिव्या दिल्या..', दोन वर्षांपासून बिग बॉसचा आवाज देणाऱ्या व्यक्तीला मिळताय धमक्या; नेमकं काय घडलं?

Vijay Vikram Singh News: ‘बिग बॉस’ला आवाज देणारे व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट विजय विक्रम सिंहने एका मुलाखतीतून आपल्या कुटुंबाला धमक्या मिळत असल्याचा खुलासा केला आहे.

Chetan Bodke

Vijay Singh Revealed People Abuse

बिग बॉस (Bigg Boss Reality Show) या रिॲलिटी शोची ख्याती सर्वत्र आहे. बिग बॉस हा शो वादग्रस्त असला तरी त्याचा टीआरपी जबरदस्त आहे. सध्या बिग बॉसचा १७ वा सीझन सुरू आहे. प्रत्येक सीझनप्रमाणे या सीझनचीही थीम वेगळी आहे. पण सर्व बदलत असलं तरी, बिग बॉसच्या आवाजामध्ये आतापर्यंत काही बदल झालेला नाही. हा आवाज विजय विक्रम सिंह यांचा आहे. त्यांच्या ह्या आवाजाला सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘बिग बॉस’म्हणून ओळख मिळाली आहे. नुकतंच विजय सिंह यांनी एका मुलाखतीतून आपल्या कुटुंबाला धमक्या मिळत असल्याचा खुलासा केला आहे. (Bollywood)

बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत विजय विक्रम सिंह यांनी सांगितले की, “मी ‘बिग बॉस’चा निवेदक आहे. पण अनेकांना असं वाटतं की मीच बिग बॉस आहे. गेल्या दोन वर्षामध्ये, मी एका लोकप्रिय स्पर्धकाची घरातून हकालपट्टी केल्यानंतर लोकांकडून मला आणि माझ्या कुटुंबीयांना धमक्यांचा सामना करावा लागत आहे.”

“लोकांना कोण समजवेल की माझा शोमध्ये फक्त आवाज आहे. मी स्पर्धकांसंबंधित कोणताही निर्णय घेत नाही. मी सर्वांना सांगतो की, बिग बॉसच्या शोमध्ये दोन आवाज आहेत. तरीही लोकांना माझ्यावर विश्वास नाही.”

“श्रोत्यांसोबत संवाद साधणारा माझा आवाज आहे. माझा आवाज लोकांना वेळ सांगणारा आणि टीव्ही प्रेक्षकांना घटनांबद्दल माहिती देणारा आहे.” अशी माहिती विजय विक्रम सिंह यांनी मुलाखतीतून दिली. (Bigg Boss)

सोबतच पुढे विजय सिंह म्हणाले, “प्रेक्षकांच्या आवडत्या स्पर्धकाला घरातून बाहेर काढल्यानंतर मला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जाते. सोशल मीडियावर माझ्यासोबत अनेकवेळा ऑनलाइन गैरवर्तन झाले आहे. मी नेहमीच लोकांना सांगतो की, मी एलिमिनेशन करत नाही. जसे त्या स्पर्धकांना मत मिळतात, त्याप्रमाणे एलिमिनेशन होते. स्पर्धकांसोबत बोलणारा माझा आवाज नाही.” (Bollywood News)

“फक्त मलाच नाही तर, माझ्या कुटुंबीयांनाही धमक्यांचा फोन आला होता. अनेकांनी या प्रकरणामध्ये माझ्या कुटुंबीयांनाही यामध्ये ओढत त्यांना धमक्या दिल्या आहेत. मी बिग बॉस नसून फक्त माझा आवाज वापरला जातो. माझ्यासोबत आणखी एका व्यक्तीचा बिगबॉससाठी आवाज आहे.” अशी माहिती विजय विक्रम सिंह यांनी मुलाखतीतून दिली. त्यांच्यासोबत दुसरा आवाज कोणाचा आहे, हे त्यांनी सांगितले नाही. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भिवंडी वाडा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 5 किमीपर्यंत वाहनांची रांग

Maharashtra Politics: बाहेर ये...तो राज साहेबांविषयी बोललाय; राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरणाऱ्याला मनसेनं बदडलं|VIDEO

Badlapur Firing : बदलापूर हादरलं! दिवसाढवळ्या आमदाराच्या बंगल्यासमोर गोळीबार

Wada News : आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष थांबेना; रायकर पाडा येथील विद्यार्थ्यांचा नदीत तराफ्यातून जीवघेणा प्रवास

Raj Thackeray: झेंडा, स्कार्फ, पक्षचिन्ह काहीच नको; मोर्चाला येण्याआधी राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

SCROLL FOR NEXT