Ankita Lokhande And Vicky Jain Trolled Saam Tv
मनोरंजन बातम्या

'Bigg Boss 17' च्या घरामध्ये भांडणाऱ्या अंकिता-विकीचे रोमँटिक फोटोशूट, नेटकरी ट्रोल करत म्हणाले - 'हे नाटक बंद करा'

Ankita Lokhande And Vicky Jain Trolled: बिग बॉसच्या घरामध्ये असल्यापासून या कपलच्या नात्यामध्ये दूरावा आला असून ते वेगळे होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या कपलची सततची भांडणं, रुसवे-फुगवे पाहून प्रेक्षक वैतागले होते. त्यामुळे त्यांना चांगलेच ट्रोल केले होते.

Priya More

Ankita Lokhande And Vicky Jain Romantic Photoshoot:

'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या शोने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरामध्ये सर्वात जास्त चर्चेत राहिलेले कपल म्हणजे टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain). या कपलने बिग बॉसच्या घरामध्ये एकत्र एन्ट्री केली होती. घरामध्ये एन्ट्री केल्यापासून ते बिग बॉसच्या घरातून बाहेर पडेपर्यंत हे कपल सतत भांडत होते.

बिग बॉसच्या घरामध्ये असल्यापासून या कपलच्या नात्यामध्ये दूरावा आला असून ते वेगळे होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या कपलची सततची भांडणं, रुसवे-फुगवे पाहून प्रेक्षक वैतागले होते. त्यामुळे त्यांना चांगलेच ट्रोल केले होते. आता बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर हे कपल आपलं नातं चागलं बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशामध्ये या कपलने रोमँटिक फोटोशूट केले आहे. यावरून आता नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून अंकिता आणि विकी जैन चर्चेत आहेत. हे कपल व्हॅलेंटाइन वीकमध्ये एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. त्यांनी नुकताच रोमँटिक अंदाजमध्ये फोटोशूट केले आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अंकिता लोखंडेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. तिच्या पोस्टवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

या फोटोशूटमध्ये अंकिता लोखंडेने गोल्डन कलरची काठ असलेली मरून कलरची साडी नेसली आहे. या साडीमध्ये अंकिता खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या हेवी साडीसोबतच अंकिताने हेवी ज्वेलरीही परिधान केली आहे. तर विकी जैनने काळ्या रंगाचा लूज लाइनिंग पायजमा आणि शॉर्ट कुर्ता परिधान केलेला दिसत आहे. या फोटोंमध्ये दोघेही अशा रोमँटिक पोजमध्ये दिसले की चाहत्यांना त्यांची दमदार केमिस्ट्री अजिबात आवडली नाही. इतकंच नाही तर त्यांनी अंकिताला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

बिग बॉसच्या घरामध्ये भांडताना दिसणाऱ्या या कपलचे घराबाहेर आल्यानंतरचे प्रेम पाहून सर्वजण त्यांना ट्रोल करत आहेत. या फोटोशूटमध्ये त्यांचे दिसणारे प्रेम हे नाटक असल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले आहे. अंकिताच्या पोस्टवर कमेंट्स करत एका युजरने लिहिले की, 'हा ड्रामा आता बंद करा.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'किती पण करा पण हा देखावा आहे.' तिसऱ्या युजरने लिहिले की,'काय माहिती पण तुमचं नातं खरं नाही वाटत', अशाप्रकारच्या कमेंट्स करत युजर्स तिला ट्रोल करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT