Firoza Khan And Munawar Faruqui Fight On Work Instagram
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17 Latest Update: बिग बॉस’च्या घरात येताच स्पर्धकांमध्ये कामावरुन जुंपली, भांडी घासण्यावरुन फिरोजा आणि मुनव्वरने घातला राडा

Bigg Boss 17 News: घरामध्ये एन्ट्री करताच अनेक स्पर्धकांनी भांडण करायला सुरूवात केली.

Chetan Bodke

Firoza Khan And Munawar Faruqui Fight

सध्या ‘बिग बॉस १७’ची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर १५ ऑक्टोबरपासून या शोला सुरूवात झाली. यंदाच्या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात १७ स्पर्धकांनी एन्ट्री केली. घरामध्ये एन्ट्री करताच अनेक स्पर्धकांनी भांडण करायला सुरूवात केली. नेहमीप्रमाणे यावेळी देखील बिग बॉस शो धमाकेदार आणि तेवढाच वादळी ठरेल यामध्ये शंका नाही.

नुकताच कलर्सच्या सोशल मीडिया हँडलवर आगामी एपिसोडचा टीझर शेअर केला आहे. टीझरमध्ये अनुराग ढोबळ आपल्या सहकाऱ्यांना घरामध्ये जे कोणी डिशमध्ये खाईल, त्याने ते धुवून टाकावे. असं तो म्हणाला. ही गोष्ट सर्वांनी मिळून ठरवलेली असून याचा फारसा कोणालाही त्रास होणार नाही. जर कोणाला काही बोलायचे असेल तर बोलू शकतात, असं अनुराग आपल्या घरातील सदस्यांना म्हणतो. त्यानंतर सर्व बसलेल्या ठिकाणी कोणी तरी खाऊन डिश तिथेच ठेवली होती. त्याकडे बोट दाखवत तो म्हणतो, कोणीतरी जेवलंय, आणि जेवून तिथेच भांडी ठेवली आहे. (Serial)

हे ऐकून अभिनेत्री फिरोजा खान संतापली आणि म्हणते, आपआपल्या डिश आपण धुवून टाकावे. फिरोजा खानचे हे वक्तव्य ऐकूण मुनव्वरही संतापतो आणि तो म्हणाला की, जो त्या ताटात खाईल, तो धुवेल असं होत नाही. ज्याच्याकडे जबाबदारी आहे, त्याने ते करावे. दरम्यान, या निर्णयावर घरातले सर्वच सदस्य आपआपले मत मांडताना दिसत आहे. अरुण श्रीकांत म्हणतो, असं चालणार नाही, ही मूलभूत गोष्ट आहे, डिश, कप आणि चमचे प्रत्येकाने स्वत:चे धुवावे.

नुकतंच बिग बॉसच्या १७ व्या सीझनला वादळी पद्धतीने सुरुवात झाली आहे. यंदाच्या सीझनमध्ये, टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेने पती विकी जैनसोबत एन्ट्री घेतली. त्यांसोबतच नील भट्ट, ऐश्वर्या शर्मा, ईशा मालवीय, अभिषेक कुमार, सनी आर्या, अनुराग ढोबळ, जिग्ना व्होरा, मुनावर फारुकी, फिरोजा खान उर्फ खानजादी, मन्नारा चोप्रा, नवीद सोले, रिंकू धवन, अरुण श्रीकांत, सना राणा खान आणि सोनिया बन्सल या सर्व स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरामध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT