Navid Sole Reveal Her Relationship With Abhishek Kumar Instagram
मनोरंजन बातम्या

Navid Sole Relationship: ‘त्याने मला प्रपोज करत किस केलं’, बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच नावेद सोलने केला मोठा खुलासा

Bigg Boss 17 Latest News: ‘बिग बॉस १७’मधून बाहेर आल्यानंतर नावेदने बिग बॉस स्पर्धक अभिषेक कुमारविषयी खळबळजनक खुलासे केले आहेत.

Chetan Bodke

Navid Sole Reveal Her Relationship With Abhishek Kumar

लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रियालिटी शो ‘बिग बॉस १७’ची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते. शो सुरू झाल्यापासून घरातील सदस्यांमध्ये भांडणं, वाद, प्रेम आणि रुसवे-फुगवे सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

नुकताच ‘बिग बॉस १७’ मध्ये तिसरा एलिमिनेशन राऊंड पार पडला. या एलिमिनेशन राऊंडमध्ये नावेद सोलला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले. बिग बॉसच्या घरातून नावेद सोल बाहेर येताच घरातील सदस्य खूपच भावूक झाल्याचे दिसले. शोमधून बाहेर आल्यानंतर नावेदने बिग बॉस स्पर्धक अभिषेक कुमारविषयी खळबळजनक खुलासे केले आहेत. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर नावेद सोलने त्याच्या आणि अभिषेकच्या रिलेशनवर भाष्य केले. नावेदने सांगितले की, ‘आम्ही दोघेही एकमेकांवर प्रेम करतो. मला अभिषेकविषयी अधिक समजून घ्यायचे होते. त्यामुळे मला बिग बॉसच्या घरात आणखी काही दिवस राहायचे होते. माझा अभिषेक क्रश असून मी त्याच्यावर प्रेम करतो. जरी अभिषेक प्रचंड आक्रमक असला तरी त्याचे मन खूप साफ आहे. त्याच्या मनामध्ये काहीही राहत नाही.’ (Bigg Boss)

‘मी जर अजून काही दिवस बिग बॉसच्या घरामध्ये राहिलो असतो तर माझी आणि अभिषेकचीही जोडी बनली असती. तो ईशा मालवीयसाठी कधीही रडलेला नाही. अभिषेकने मला एकदा प्रपोज केला होता आणि किससुद्धा केलं होतं. आमच्यातलं नातं अनब्रेकेबल होते. मी अभिषेकवर खूप प्रेम करतो. मला पुन्हा त्याला भेटायला आवडेल.’, असं नावेद सोलने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सांगितले. (Entertainment News)

नुकत्याच झालेल्या शॉकिंग एविक्शनमध्ये, बिग बॉसने दिमाग रुममधील सदस्यांना परफॉर्मेन्स रिव्ह्यूसाठी बोलवलं होतं. यावेळी विकी जैन, अरुण शेट्टी, सनी आर्या, सना रईस खान आणि अनुराग डोव्हाल यांना आर्काइव्ह रूममध्ये बोलावले होते. बिग बॉसने या सर्व सदस्यांकडून परफॉर्मेन्स रिव्ह्यू घेतला. यावेळी सर्व स्पर्धकांनी जिग्ना व्होरा, रिंकू धवन आणि नावेद सोल या तिघांपैकी एकाला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. यावेळी बिग बॉसने नावेद सोलला घरातून बाहेर काढले. (Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Accident: अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं; बापलेकीचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

SCROLL FOR NEXT