Ticket To Finale Latest News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17 Latest News: ‘तिकिट टू फिनाले’ साठी बिग बॉसचा स्पर्धकांना नवा टास्क; कोण मारणार पहिली बाजी?

Bigg Boss 17 News: 'बिग बॉस १७' मधील पहिला 'तिकीट टू फिनाले' कोणाला मिळू शकतो, याची भविष्यवाणी एका बिग बॉस फॅन्स पेजने केली आहे.

Chetan Bodke

Ticket To Finale Latest News

लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त समजला जाणारा 'बिग बॉस १७'चा अवघ्या काही दिवसांवरच ग्रँड फिनाले येऊन ठेपला आहे. सध्या शोमध्ये 'तिकीट टू फिनाले' चर्चा होत आहे. अखेर 'बिग बॉस १७' मधील पहिला 'तिकीट टू फिनाले' कोणाला मिळू शकतो, याची भविष्यवाणी एका बिग बॉस फॅन्स पेजने केली आहे.

'बिग बॉस १७'च्या ग्रँड फिनालेच्या चर्चेदरम्यान, निर्मात्यांनी स्पर्धकांसमोर एक नवीन टास्क दिला आहे. त्या टास्कचं नाव 'टॉर्चर टास्क' असं आहे. या नव्या टास्कमुळे घरामध्ये जोरदार वाद सुरु झाले असून स्पर्धकांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

नुकत्याच झालेल्या 'वीकेंड का वार' एपिसोडमध्ये, करण जोहरने स्पर्धकांना, 'तिकीट टू फिनाले' टास्क लवकरच घरामध्ये आयोजित केले जाईल. जो एक स्पर्धक जिंकेल आणि थेट फिनालेमध्ये पोहोचेल.

'बिग बॉस १७' मध्ये पहिला 'तिकीट टू फिनाले' कोणता स्पर्धक जिंकणार याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच होत आहे. 'बिग बॉस १७' मधील पहिला 'तिकीट टू फिनाले' कोणाला मिळू शकतो, याची भविष्यवाणी एका बिग बॉस फॅन्स पेजने केली आहे.

बिग बॉस 17 संबंधित बातम्या शेअर करणाऱ्या 'बिग बॉस तक' या फॅन पेजने मनारा चोप्रा जिंकणार असल्याचं सांगितलं आहे. "बिग बॉसच्या 'तिकीट टू फिनाले' साठी पहिली स्पर्धक मन्नारा चोप्रा असू शकते. त्यासोबतच ती कॅप्टनही होऊ शकते. 'टॉर्चर टास्क' मध्ये ती जिंकण्याची शक्यता असून तिलाच पहिलं फिनालेचं तिकिट मिळण्याची शक्यता आहे." अशी त्या फॅनपेजने शक्यता वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यात अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची होणार तपासणी

Rahul Gandhi: आदिवासी विद्यार्थिनींची प्रेग्नेंसी टेस्ट? राहुल गांधींचं फडणवीसांना पत्र, सरकारसमोर उभे केले मोठे सवाल

Maharashtra Politics: निधीच्या वादावर तोडगा, महामंडळ वाटपाचा मुर्हूत; महायुतीच्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय

Tuesday Horoscope : आज या राशींच्या आयुष्यात होणार मोठा बदल; अचानक मिळेल गुड न्यूज, जाणून घ्या तुमची रास

MP Disqualification: आता सुप्रीम कोर्टात लागणार बंडखोर खासदारांचा निकाल; २० खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT