Ankita Lokhande Angry On Mother In Law Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: 'तू तुझ्या नवऱ्याला अशीच लाथ मारायची का?', सासूचं बोलणं ऐकून भडकली अंकिता लोखंडे

Ankita Lokhande Angry On Mother In Law: बिग बॉसच्या घरामध्ये अंकिता लोखंडेची (Ankita Lokhande) आई आणि विकी जैनची (Vicky Jain) आई आली होती. आईला भेटल्यानंतर अंकिता खूपच भावूक झाली.

Priya More

Bigg Boss 17 Promo:

'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) मधील स्पर्धकांचे राडे, भांडणं, रुसवे-फुगवे आपण पाहत आहोत. हे सर्व स्पर्धक प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. पण बिग बॉसच्या घरामध्ये राहणाऱ्या या स्पर्धकांचे वागणं त्यांच्या कुटुंबींयांना खटकताना दिसत आहे. अशामध्ये आता बिग बॉसच्या घरामध्ये फॅमिली वीक सुरू झाला आहे. बिग बॉसच्या घरामध्ये अंकिता लोखंडेची (Ankita Lokhande) आई आणि विकी जैनची (Vicky Jain) आई आली होती. आईला भेटल्यानंतर अंकिता खूपच भावूक झाली.अंकिताच्या सासूने यावेळी विकीसोबत ती ज्यापद्धतीने वागली आहे त्यावर नाराजी व्यक्त करते. सासूचं बोलणं ऐकून अंकिताला प्रचंड राग येतो. बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये हे दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बिग बॉसच्या नुकताच समोर आलेल्या नव्या प्रोमो व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बिग बॉसच्या घरामध्ये विकीची आई आणि अंकिताची आई एन्ट्री घेतात. विकीची आई रंजना जैन वेगळ्याच अंदाजात एन्ट्री घेतात. त्या घरामध्ये सिंहासोबत प्रवेश करतात. घरामध्ये एन्ट्री करताना त्या म्हणतात की, 'जगण्याची अशी कला कुठून शिकलीस, जगण्याची कला मी समुद्रातून शिकली आहे. शांतपणे राहा आणि आपल्याच आनंदात राहा.' विकीच्या आईचे बोलणं ऐकून सगळे हसायला लागतात आणि मस्ती सुरू होते. पण हे वातावरण फार काळ टिकत नाही कारण अंकिता आणि विकीच्या आईमध्ये वाद सुरू होतो.

व्हिडिओमध्ये पुढे दिसते की, विकीची आई त्या दिवसाविषयी बोलत आहे जेव्हा अंकिताने त्यांच्या मुलाला म्हणजेच विकीला लाथ मारली होती. त्या अंकिताला म्हणतात की, 'ज्या दिवशी तू विकीला लाथ मारलीस. त्या दिवशी मी तुझ्या आईला फोन करून विचारले की तू तुझ्या नवऱ्याला अशीच लाथ मारायची का?' सासूचे हे शब्द ऐकून अंकिताला राग येतो. रागामध्ये अंकिता सासूला म्हणते की, 'आईला बोलवायची काय गरज होती?' त्यानंतर विकीची आई म्हणते की, 'विचार कर किती वेदना झाल्या असतील.' त्यानंतर अंकिता म्हणते की, 'माझे वडील वारले आहेत. आई प्लीज माझ्या आई-वडिलांना काही बोलू नका.'

सध्या सोशल मीडियावर अंकिता लोखंडेचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहेत. नेटिझन्स अंकिताच्या सासूलाच निगेटिव्ह म्हणत आहेत. अंकिताचे बिग बॉसच्या घरामध्ये विकीसोबतचे वागणे तिच्या सासूला अजिबात पटत नाही. याआधी देखील अंकिताच्या आईने आणि सासूने त्यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क केला होता. तेव्हा देखील अंकिताच्या सासूने विकीसोबत नीट वाग असे सांगितले होते. बिग बॉसच्या घरामध्ये अंकिता आणि विकी यांच्यामध्ये सतत वाद, रुसवे-फुगवे होत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT