Ankita Lokhande And Vicky Jain Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita Lokhande And Vicky Jain: ठरलं तर मग! अंकिता लोखंडे पती विकी जैनसोबत 'बिग बॉस १७'च्या घरात करणार एन्ट्री?

Ankita Lokhande And Vicky Jain Enter Bigg Boss House: अंकिता आणि विकीचा बिग बॉसच्या घरातील प्रवास पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

Priya More

Bigg Boss Season 17:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त रियालिटी शो बिग बॉसच्या (Bigg Boss) नव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 'बिग बॉसचा १७' वा सीझन (Bigg Boss 17) येत्या १५ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनमध्ये कोण-कोणते सेलिब्रिटी बिग बॉसच्या घरामध्ये एन्ट्री घेणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. अशामध्ये काही सदस्यांची नाव फायनल देखील झाली आहेत.

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) यावेळी बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश करणार असल्याचे फिक्स झाले आहे. पण अंकितासोबत तिचा नवरा म्हणजेच विकी जैन (Vicky Jain) बिग बॉसच्या या सीझनमध्ये दिसणार का हा प्रश्न अनेकांना पडला आहे. दोघांच्याही चाहत्यांना हे कपल बिग बॉसच्या घरामध्ये जावे अशी इच्छा आहे. बिग बॉसच्या घरात त्यांचा प्रवास पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. बिग बॉस १७ मध्ये हे कपल जाणार की नाही याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण अंकिता जाणार हे कन्फर्म आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडेने 'पवित्र रिश्ता' या प्रसिद्ध मालिकेमध्ये अर्चनाची भूमिका साकारली होती. या मालिकेच्या माध्यमातूनच अंकिता घराघरात पोहचली. अंकिताने बॉलिवूड चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. 'मणिकर्क्निका: द क्वीन ऑफ झांसी' मध्ये तिने कंगना रनौतसोबत काम केले. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले.

अंकिता लोखंडेने २०२१ मध्ये बिझनेसमन विकी जैनसोबत लग्न केले. तेव्हापासून ही जोडी खूपच चर्चेत आहे. या कपलला प्रेक्षकांकडून देखील खूप चांगली पसंती मिळते. सोशल मीडियावर दोघेही एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करत असतात. नुकताच या कपलने रियालिटी शो 'स्मार्ट जोडी'मध्ये हजेरी लावली होती. त्यानंतर आता ते 'बिग बॉस १७'मध्ये येण्यासाठी सज्ज झाले असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, अंकिता लोखंडे ही बिग बॉसच्या घरामध्ये एन्ट्री करणारी सर्वात महागडी सदस्य असल्याची चर्चा सुरू आहे. अंकिताने एका आठवड्यासाठी १० ते १२ लाख रुपये मानधन घेतल्याची चर्चा सुरु आहे. अंकिताने बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी तब्बल २०० आउटफिट्स खरेदी केल्याची चर्चा आहे. अंकिता लोखंडेसोबत इतर काही सदस्यांची देखील नावं फायनल झाली आहेत जे बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश करणार आहेत. नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा, ईशा मालवीय आणि अभिषेक कुमार, अरमान मलिक आणि पायल मलिक, सनाया ईरानी आणि मोहित सहगल या स्पर्धकांची नावं फायनल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rush Driving: रस्त्यावर वाहन चालवताना 'या' चुका केल्या तर नाही मिळणार विमा: सुप्रीम कोर्ट

Shocking: वॉशरूमध्ये लपून महिला सहकाऱ्यांचे VIDEO काढायचा, इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक

Nails Cutting Tips: नखं कापण्यासाठी योग्य दिवस कोणता?

कन्नड नगरपरिषदेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना; थरारक VIDEO

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

SCROLL FOR NEXT