टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद (Actress Urfi Javed) आपल्या नव्या आणि हटके लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी चर्चेत राहण्यामागचे कारण म्हणजे तिची अतरंगी ड्रेसिंग स्टाईल आणि क्रिएटिव्हिटी. सध्या उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये उर्फी जावेद रस्त्यावर पडलेले सिगारेटचे तुकडे गोळा करताना दिसत आहे.
उर्फी हे असं का करतेय? असा प्रश्न अनेकांना पडला. पण उर्फी टाकाऊ वस्तूंपासून काय तयार करेल याचा नेम नाही. उर्फीने या सिगारेटच्या तुकड्यांपासून थेट ड्रेस तयार केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरला आहे.
उर्फी जावेदने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नव्या लूकमधील व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे. कारण उर्फीची यावेळीची ड्रेसिंग स्टाईल जरा हटकेच आहे. कोणी कल्पना देखील केली नसेल की सिगारेटच्या थोकट्यांचा वापर करून ड्रेस तयार होऊ शकतो. पण उर्फीने तर कमाल केली आहे. तिने सिगारेटच्या थोकट्यांपासून सूपरहॉट वनपीस तयार केला आहे. उर्फी या वनपीसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, व्हिडीओच्या सुरूवातीलाच 'नो स्मोकिंग, सिगारेट पिणं आरोग्यासाठी घातक' असे लिहिण्यात आले आहे. त्यानंतर हातामध्ये वाटी घेऊन उर्फी जावेद रस्त्याच्या कडेला पडलेले सिगारेटचे थोकटे गोळा करताना दिसत आहे. त्यानंतर ती घरी जाऊन एक-एक सिगारेटच्या थोकट्यांचा कागद बाजूला काढते. त्यानंतर ती एक-एक तुकडे कापडावर चिकटवताना दिसत आहे. उर्फीने केलेल्या मेहमतीला यश येत आणि त्यापासून सुंदर ड्रेस तयार होतो.
या व्हिडीओच्या माध्यमातून उर्फीने स्मोकिंग करू नकाचा मेसेज दिला आहे. तिने हा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'सिगारेटपासून ड्रेस. यानंतर अनेक दिवस माझ्या हातांना सिगारेटचा वास येत होता' असे लिहिले आहे. हा ड्रेस तयार करून तिच्या हाताला बरेच दिवस सिगारेटचा वास येत होता, असे तिने सांगितले आहे. उर्फी जावेदच्या या व्हिडीओला १ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. उर्फीच्या क्रिएटीव्हिटीचे तिच्या चाहत्यांनी कौतुक केले आहे. या व्हिडीओवर 'कोणीतरी सिगारेटचा सकारात्मक वापर केला', 'उर्फीचा ड्रेस पहिल्यांदा मला आवडला', 'या ड्रेसमध्ये उर्फी खूपच सुंदर दिसते', अशा कमेंट्स करत चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.