इस्रायल-पॅलेस्टिनी (Israel-Palestine Crisis) यांच्यात शनिवार सकाळपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंच्या सुमारे १००० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अमेरिका (America) आणि नेपाळसह (Nepal) इतर देशांतील नागरिकांचाही समावेश आहे. या युद्धाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) या युद्धाचे भयानक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.
या युद्धावर जगभरातील लोकांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. सोशल मीडियावर एकीकडे काही जण इस्रायलचे समर्थन करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे काही लोक पॅलेस्टिनीचे समर्थन करताना दिसत आहेत. आता नेहमी चर्चेत राहणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनेही या युद्धावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
स्वरा भास्करने नुकताच पॅलेस्टिनी आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने पॅलेस्टिनीला सपोर्ट केला आहे. स्वरा भास्करने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर केली आहे. तिने या स्टोरीमध्ये असे लिहिले आहे की- 'जेव्हा इस्रायलने पॅलेस्टिनीवर हल्ला केला तेव्हा तुम्हाला धक्का बसला नसेल. इस्रायलने पॅलेस्टिनीवर हल्ला करत त्याठिकाणी राहणाऱ्या लोकांची घरे उद्ध्वस्त केली आणि जबरदस्तीने ती हिसकावून घेतली. त्यांनी पॅलेस्टिनीच्या मुलांना आणि तरुणांना देखील सोडले नाही.'
तसंच, 'गाझावर सुमारे १० वर्षे सतत हल्ले केले आणि बॉम्ब फेकले. म्हणून मला इस्रायलवरील हल्ल्याबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या लोकांचे हे कृत्य पाखंडीसारखे म्हणजे ढोंगीसारखे वाटत आहे.', असे स्वराने इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले आहे. इतकेच नाही तर अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर अनेक जणांच्या पोस्टही शेअर केल्या आहेत.
फक्त स्वरा भास्करच नाही तर अभिनेत्री गौहर खानने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. गौहरने पॅलेस्टिनींचे समर्थन केले आहे. तिने पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, अत्याचारी कधीपासून बळी पडले?' दरम्यान गौहरच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल केले जात आहे.
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा या दोन देशांदरम्यान सुरू असलेल्या युद्धात अडकली होती. 'हैफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सहभागी होण्यासाठी नुसरत तिथे गेली होती. या चित्रपट महोत्सवात नुसरत भरुचाचा 'अकेली' हा चित्रपट दाखवण्यात आला. पण त्याच दरम्यान तिथे युद्ध सुरू झाले आणि नुसरत तिथेच अडकली. मात्र अभिनेत्री आता सुखरूप मायदेशी परतली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.