MC Stan Trolled Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mc Stan: 'तुझे ८० हजाराचे शूज चोर बाजारात फक्त...' म्हणत MC स्टॅनची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

एका पार्टीदरम्यान स्टॅनने त्याचे ८० हजारांचे शूज पापाराझींना दाखवले. पण स्टॅनच्या या कृतीने नेटकऱ्यांनी बरेच ट्रोल केले आहे.

Chetan Bodke

Mc Stan Trolled: मूळचा पुणेरी असलेल्या MC स्टॅनची हवा सध्या सर्वत्र जोरदार सुरू आहे. Stan ची घरात एन्ट्री होताच त्याच्या फॅन्स संख्येत झपाट्याने वाढ झाली. 'बिग बॉस १६' च्या घरातून बाहेर येताच त्याचे नशीबच पूर्ण पालटले आहे. MC स्टॅन सध्या बराच चर्चेत आला आहे. पण तो सध्या त्याच्या फॅशन मुळे बराच ट्रोल होतोय. नुकतेच त्याने एका पार्टीसाठी हजेरी लावली होती.

MC स्टॅन हा ‘बिग बॉस’च्या घरातील सर्वाधिक चर्चेतील चेहरा होता. घरातील मंडलींबरोबरच स्टॅनच्या हटक्या लूकची ही सर्वत्र चर्चा होत होती. रॅपरच्या गाण्यांबरोबरच त्याच्या हटके स्टाइलनेही तरुणाईला वेड लावलं होतं. स्टॅनच्या गळ्यातील चैन व ८० हजारांच्या शूजने प्रत्येकाचं लक्ष वेधलं. एका पार्टीदरम्यान स्टॅनने त्याचे ८० हजारांचे शूज पापाराझींना दाखवले. पण स्टॅनच्या या कृतीने नेटकऱ्यांनी बरेच ट्रोल केले आहे. एका इंस्टाग्राम पेजवरुन स्टॅनची व्हिडीओ शेअर करण्यात आली आहे.

या व्हिडीओवर नेटकरी म्हणतात, छपरी म्हणजे काय? हे बिग बॉसच्या १६ व्या सीझनच्या विजेत्याला विचारा, असे म्हणत त्याला ट्रोल केले. तर आणखी एक नेटकरी म्हणतो, हे शूज मी तुला ५०० रुपयात आणून देतो. तर आणखी एक म्हणतो, अशेच शूज तुला मी २००० रुपयात आणून देतो. एकाने तर हद्दच पार केली, कमेंट करत नेटकरी म्हणतो, तुझे ८०,००० शूज चोर बाजारात सर्रास विकतात. म्हणत त्याने ट्रोल केले.

'बिग बॉस १६' च्या घरातून बाहेर येताच त्याला बरीच मोठी लॉट्री लागली आहे. सोबतच त्याने आपल्या मानधनात ही घसघशीत वाढ केली असून त्याचा चाहता वर्ग देखील दिवसेंदिवस वाढत आहे. स्टॅनला अनेक ब्रँड्स कडून ऑफर्स मिळत असून लवकरच तो बॉलिवूडमध्येही डेब्यू करत आहे. सोबतच त्याला बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक साजिद-वाजिद यांच्याकडूनही गाण्याची ऑफर मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

SCROLL FOR NEXT