Natural Skin care : तांदळाच्या पिठाचा असा करा वापर! घरच्या घरी तयार करा आंघोळीसाठी खास साबण

How to make natural bath soap using rice flour : तांदळाचे पीठ त्वचेसाठी एक उत्कृष्ट नैसर्गिक क्लिंझर म्हणून काम करते, ज्यामुळे त्वचा उजळ आणि मुलायम होते. घरच्या घरी हा खास साबण तयार करून वापरल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.
How to make natural bath soap using rice flour
How to make natural bath soap using rice flour saam tv
Published On: 

त्वचेची स्वच्छता आणि काळजी घेण्यासाठी अनेकजण बाजारातील महागड्या साबणांचा वापर करतात. मात्र, घरातील काही मोजक्या पदार्थांचा वापर करून तुम्ही साबण तयार करू शकता. तांदळाचे पीठ, बटाटा आणि कोरफड यांसारख्या सहज उपलब्ध पदार्थांपासून तयार केलेला हा साबण सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे हा साबण तयार करण्यासाठी फारसा खर्चही येत नाही. घरच्या घरी तांदळाच्या पिठाचा साबण कसा बनवायचा, जाणून घ्या.

साबण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

हा साबण बनवण्यासाठी एक आवडीचा साबण, ४ ते ५ चमचे तांदूळ, एक बटाटा, दोन चमचे कोरफड जेल आणि दोन व्हिटॅमिन ई कॅप्सूल आवश्यक आहेत. यासाठी ग्लिसरीन किंवा क्रीम बेस असलेला साबण निवडू शकता.

How to make natural bath soap using rice flour
Career Growth : नोकरीत तुमची जागा कुणीच घेऊ शकणार नाही! करिअरमध्ये पुढे जायचंय? आत्मसात करा ही ५ कौशल्ये

असा तयार करा तांदळाच्या पिठाचा साबण

सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुऊन घ्या. त्यानंतर स्वच्छ कापडावर पसरवून पंख्याखाली पूर्णपणे वाळवून घ्या. तांदूळ वाळल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पावडर तयार करा.

आता एक बटाटा सोलून स्वच्छ धुवा आणि किसून घ्या. किसलेल्या बटाट्याचा स्वच्छ कापडाच्या मदतीने रस काढून घ्या. एका भांड्यात दोन चमचे कोरफड जेल घ्या. त्यामध्ये बटाट्याचा रस आणि दोन व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील तेल मिसळा. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या.

यानंतर निवडलेला साबण लहान तुकड्यांमध्ये कापून घ्या. डबल बॉयलर पद्धतीने तो वितळवून घ्या. साबण वितळल्यानंतर गॅस बंद करा. आता त्यामध्ये तयार केलेले मिश्रण आणि दोन मोठे चमचे तांदळाची पावडर घाला. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा.

How to make natural bath soap using rice flour
Skin Care : चेहऱ्यावर हवा आहे नैसर्गिक ग्लो? रोज खा हे ५ पदार्थ, त्वचा दिसेल चमकदार

तयार मिश्रण साबणाच्या साच्यात किंवा पेपर कपमध्ये ओता. साधारण ३ ते ४ तास ते सेट होण्यासाठी ठेवा. साबण पूर्णपणे घट्ट झाल्यानंतर साच्यातून बाहेर काढा. अशा प्रकारे घरच्या घरी तांदळाच्या पिठाचा साबण तयार होईल.

वापरताना घ्या काळजी

हा साबण वापरण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करा. संवेदनशील त्वचा किंवा ॲलर्जी असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. घरगुती साबणामुळे त्वचा गोरी होते किंवा डाग नक्कीच जातात, असा वैज्ञानिक पुरावा नाही. त्वचेची स्वच्छता आणि योग्य काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.