MC Stan Gifts Instagram @m___c___stan
मनोरंजन बातम्या

MC Stan Gifts: 'बिग बॉस' विजेत्या एमसी स्टॅनला मिळाली 'या' कोट्यावधींच्या भेटवस्तू, किंमत ऐकाल तर येईल आकडी

'बिग बॉस' जिंकल्यानंतर एमसी स्टॅनला अनेक अभिनंदनाचे मेसेज आणि गिफ्ट्स मिळाले आहेत.

Saam Tv

MC Stan Gift List After Winning Bigg Boss: 'बिग बॉस १६'चा विजेता एमसी स्टॅनची सगळीकडे चर्चा आहे. रॅपर एमसी स्टॅनचे अनेक चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर त्याचे ९ मिलियन फॉलोवर्स आहेत. 'बिग बॉस'नंतर त्याने केलेल्या त्याच्या पहिल्या लाईव्हला त्याच्या चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. या लाईव्हने शाहरुख खान आणि विराट कोहली यांचा देखील रेकॉर्ड मोडला होता.

'बस्ती की हस्ती' असलेल्या एमसी स्टॅनच्या लाईव्ह ५४१ हजार लोकांनी पाहिले होते. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की एमसी स्टॅनचे किती फॅन फॉलोविंग आहे ते. 'बिग बॉस'च्या घरामध्ये गेल्यानंतर आणि विजेता झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये भर पडली आहे.

'बिग बॉस' जिंकल्यानंतर एमसी स्टॅनला अनेक अभिनंदनाचे मेसेज आणि गिफ्ट्स मिळाले आहेत. त्याच्या या गिफ्ट्सची सर्वत्र चर्चा आहे. चला तर मी पाहूया एमसी स्टॅनला कोणी आणि काय गिफ्ट दिलं आहे.

भारतातील सुप्रसिद्ध रॅपर बादशाह आणि एमसी स्टॅन यांचा खूप चांगला बॉण्ड आहे. बादशाहने एमसी स्टॅनला ५० लाख रुपयांची सोन्याची चैन गिफ्ट दिली आहे.

एमसी स्टॅनची गर्लफ्रेंड शेख अमन अका बुबाने त्याच्या बीएमडब्ल्यू बाईक गिफ्ट केली आहे. या बाईकची किंमत ४५ लाख आहे.

एमसी स्टॅन रोहित शेट्टीचा आवडता स्पर्धक आहे. एमसी स्टॅन 'खतरो के खिलाडी १३' सहभागी व्हावे अशी रोहितीचो ईच्छा आहे. रोहितने एमसी स्टॅनला ४५ लाखांची मिनी कूपर गाडी भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे.

बिग बॉसचा होस्ट आणि सर्वांचा भाईजान सलमान खानने एमसी स्टॅनला प्लॅटिनम ब्रेसलेट गिफ्ट केले आहे. ज्याची किंमत १५ लाख रुपये आहे. सलमानने अनेकदा सर्वांसमोर एमसी स्टॅनचे कौतुक केले आहे.

'बिग बॉस १६'चा स्पर्धक आणि एमसी स्टॅनचा मित्र अब्दू रोजीक याने एमसी स्टॅनला 'चोपर्ड'चे घड्याळ गिफ्ट केले आहे. या घोड्याची किंमत ६ लाख रुपये आहे.

साजिद खान आणि एमसी स्टॅनचा बॉण्ड आपण 'बिग बॉस'च्या घरात पाहायला मिळाला आहे. साजिदची बहीण आणि निर्माती फराह खानने एसजीदच्या नवीन मित्रांना पार्टी दिली आहे. तर साजिदने एमसी स्टॅनला हिऱ्याची चैन गिफ्ट केली आहे. या चैनीची किंमत ३ लाख रुपये आहे.

टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस'ची स्पर्धक निम्रित कौर अहलुवालिया हिने एमसी स्टॅनला ब्रँड न्यू रोलेक्स घड्याळ गिफ्ट केले आहे. या घड्याळाची किंमत २. लाख रुपये आहे.

एका युट्युब चॅनेलने ही माहिती दिली आहे. यावर अद्याप एमसी स्टॅन किंवा त्याच्याशी संबंधिक कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT