MC Stan Big Boss 16 Saam Tv
मनोरंजन बातम्या

MC Stan प्रेमाच्या जाळ्यात, कोण आहे 'बुबा'?; थेट आईनेच केला खुलासा

MC स्टॅनला सर्वच स्पर्धक नेहमी 'बुबा' नावाने चिडवायचे. नक्की ही 'बुबा' चला तर जाणून घेऊया...

Chetan Bodke

MC Stan On Bigg Boss: MC स्टॅन 'बिग बॉस १६'चा विजेता म्हणून जाहीर झाला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्टॅनचा पहिल्या दिवसापासूनचा प्रवास एका क्षणात आपल्या डोळ्यासमोरुन जातो. MC स्टॅनचे घरात शिव ठाकरे, साजिद खान, सुंबूल तौकीर खान, अब्दु रोझिक आणि निम्रत कौर यांची निखळ मैत्री दिसली. MC स्टॅनला सर्वच स्पर्धक नेहमी 'बुबा' नावाने चिडवायचे. MC स्टॅनची आई जेव्हा त्याला भेटायला आली होती, त्यावेळी ही त्याला सर्वच चिडवत होते. नक्की ही 'बुबा' चला तर जाणून घेऊया...

घरातील सर्व सदस्य एमसी स्टॅनला त्याची मैत्रीण अनम शेख म्हणजेच 'बुबा' या नावाने चिडवतात. आई वहिदा तडवीच्या समोर त्याची पोलखोल केली होती. शोमध्ये स्टॅनच्या आईला दोघांच्याही लग्नाबाबत विचारण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपुर्वी स्टॅनच्या आईने बिग बॉसच्या घरात हजेरी लावली होती. त्यावेळी स्टॅनच्या आईला भेटण्यासाठी घरातील अनेक सदस्य भेटायला आले होते.

शालिन भानोत आणि शिव ठाकरेने स्टॅनच्या आईला बुबाबद्दल विचारले होते, त्यावेळी त्या म्हणाल्या, "ती चांगली मुलगी आहे." तर शिव स्टॅनच्या आईला विचारतो, लग्न पुढच्या वर्षी होणार आहे का? यावर स्टॅनची आई म्हणते, "देवाची इच्छा आहे म्हणत हसतात." आईचे बोलणे ऐकून स्टॅनही हसायला लागतो. सोबतच यावेळी स्टॅनच्या आईने काही दिवसांपूर्वी बुबा त्यांना घरी भेटण्यासाठी आली होती.

एमसी स्टेनच्या आईनेही शालिनला भांडणाच्या ओघात कोणाच्याही पालकांबद्दल अर्वाच्च्य भाषेच बोलू नये, असा उत्तम सल्ला दिला. तर भानोतने एमसी स्टॅनला शिवीगाळ केल्याबद्दल आणि त्याच्या कुटुंबाला भांडणात ओढल्याबद्दल त्याच्या आईसमोर ताबडतोब हात जोडून माफी मागितली. सोबतच अर्चना गौतमला स्टॅनसोबत जास्त भांडण न करण्याचाही सल्ला यावेळी दिला. स्टॅनच्या आईने शिवला सांगितले की, त्यांना स्टॅन आणि शिवची मैत्री फार आवडते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gk : मोठ्या प्राण्यांचे तोंड लांब का असते? कारण वाचून तुम्ही ही पडाल विचारात

Maharashtra Live News Update : मंत्री गिरीश महाजन शिक्षकांच्या आंदोलन स्थळी

Dhule News: पांझरा नदीला पूर, दुचाकीस्वाराचा जीवघेणा प्रवास, स्थानिकांच्या मदतीनं बचावला; काळाजाचा ठोका चुकवणारा VIDEO

मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी, निकेत कौशिक यांची नियुक्ती

Mathri Recipe : चिप्स, कुरकुरे सोडा; मुलांसाठी घरीच कुरकुरीत 'मठरी' बनवा

SCROLL FOR NEXT