Shiv Thakare Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shiv Thakare Viral Video: शिव ठाकरेचा 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल, चाहतेही पडले बुचकळ्यात

ट्रॉफीसाठी शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी आणि MC स्टेन यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित आहे.

Chetan Bodke

Bigg Boss Fame Shiv Thakare Viral Video: अखेर तो क्षण आला. आज सायंकाळी 'बिग बॉस'च्या सोळाव्या सीझनच्या विजेत्याचे नाव जाहीर करण्यात येणार आहे. नक्कीच ही स्पर्धा खूप अटीतटीचा होणार आहे. सर्वच स्पर्धकांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला आवडता स्पर्धक विजेता होणार अशाच पोस्ट व्हायरल केल्या आहेत. ट्रॉफीसाठी शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी आणि MC स्टेन यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित आहे.

पण सध्या सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका चौधरी 'बिग बॉस 16'ची ट्रॉफीवर आपले नाव कोरण्याची शक्यता आहे. शिव ठाकरे आणि MC स्टेन या दोघांपैकी एकजण उपविजेता होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नक्की ट्रॉफीवर कोणता स्पर्धक आपले नाव कोरणार हे संध्याकाळीच समजणार आहे. दरम्यान शिव ठाकरेचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडिओ 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या सीझनचा आहे, त्यावेळी शिव ठाकरेने दुसऱ्या सीझनच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. व्हिडिओमध्ये होस्ट महेश मांजरेकर शिव ठाकरे आणि नेहा शितोळे यांचा हात धरून स्टेजवर उभे आहेत. विजेत्याचे नाव ऐकण्यासाठी सध्या प्रत्येकजण कमालीचा उत्सुक आहे. दरम्यान, महेश मांजरेकर यांनी शिव ठाकरेचे नाव विजेते म्हणून घोषित केले. त्याचे विजेता म्हणून घोषणा होताच त्याला थोडा आश्चर्याचा धक्का बसतो. त्याच्या चेहेऱ्यावरील हा आनंद गगनात मावत नव्हता.

शिव ठाकरेचे चाहते हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल करत आहेत आणि आशा करत आहेत की इतिहासाची पुनरावृत्ती होईल. शिव ठाकरेचे चाहते 'बिग बॉस 16' निकाल ऐकण्यासाठी कमालीचे उत्सुक आहेत. शिव ठाकरेला विजयी करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला भरभरुन वोट्स देत होते. परंतू या वोटिंग लाईन्स आज दुपारी १२ वाजल्यापासून बंद झाल्या आहेत.

शिव ठाकरेला जिंकवण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला सपोर्ट केला होता. त्यामध्ये भाजपा खासदार नवनीत राणा, मनसे नेते अमेय खोपकर यांनी ही शिव ठाकरेला सपोर्ट केला होता.

'बिग बॉस १६' चा ग्रँड फिनाले १२ फेब्रुवारीला पार पडणार आहे. सलमान खान दोन आठवड्यांनंतर शोचा होस्ट म्हणून परत येत असून तो विजेत्याची घोषणा करणार आहे. सध्या 'बिग बॉस १६' मधील टॉप ५ स्पर्धकांमध्ये शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, MC स्टेन, शालीन भानोत आणि अर्चना गौतम आहेत. शिव, प्रियांका आणि स्टेन हे टॉप-3 स्पर्धक आहेत आणि त्यापैकी एकच विजेता असेल असे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - मुंबई महापालिका निवडणूकीसाठीच्या मतदारयादीसंदर्भात धक्कादायक माहिती समोर

Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई; एनकाउंटरमध्ये ५ नक्षलवाद्यांचा खात्मा, DRG जवान शहीद

Virat Kohli Century: विराट कोहलीचं सलग दुसरं शतक, गौतम गंभीरची रिअ‍ॅक्शन व्हायरल

Vasai-Virar: वसई-विरारमध्ये भाजपची ताकद वाढली, बड्या नेत्यांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश

Glowing Skin Care Tips: दिवसभरच्या थकव्यामुळे चेहरा काळवंडलाय? या सोप्या टिप्स फॉलो करा

SCROLL FOR NEXT