Bigg Boss 16 Latest Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 16: एम.सी.स्टॅन आणि शालीनमधील वाद विकोपाला, नेमकं असं काय घडलं?

पत्रकारांच्या समोरच एम.सी.स्टॅन आणि शालीनमधील वाद बराच विकोपाला गेला होता.

Chetan Bodke

Bigg Boss 16: 'बिग बॉस 16'चा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. या सीझनला टॉप-५ फायनलिस्ट मिळाले आहेत.आता यांच्यापैकी कोण 'बिग बॉस 16' ची विजेती ठरणार हे १२ फेब्रुवारीला कळणार आहे. पण त्याआधी या पाच फायनलिस्टला ८ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या माध्यमांच्या टोकदार आणि अवघड प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. मात्र यादरम्यान शालीन भानोत आणि एमसी स्टेन यांच्यात लढत होणार आहे.

शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, एम.सी. स्टेन, शालीन भानोत आणि अर्चना गौतम हे टॉप- ५ फायनलिस्ट स्पर्धक आहेत. आता यांच्यापैकी कोण 'बिग बॉस 16' ची विजेती ठरणार हे १२ फेब्रुवारीला कळणार आहे. आज संध्याकाळी होणाऱ्या बिग बॉस 16 च्या आगामी एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, शालिन भानोत पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देते तेव्हा असे काही घडते की त्या उत्तरावर एम.सी.स्टॅन तिच्यावर रागावतो. पत्रकारांसमोर एम.सी.स्टॅन तिला चांगले फटकारतो. माध्यमकर्मी घराबाहेर पडल्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण होते.

एका पत्रकाराने शालीनला विचारले की तुझा मास्टरस्ट्रोक काय होता, टीनासोबतचे संबंध काय होते. शालीन या प्रश्नाचे उत्तर देत असताना स्टेन मीडियाकडे काही हातवारे करत आहे. ही गोष्ट शालीनला पटली नाही आणि त्यांच्यात वादाचे खटके उडाले. तेव्हा शालिन स्टॅनला बोलतो, 'मी तुझ्याशी बोलू का? मला बोलू दे.'जेव्हा सर्व पत्रकार बिग बॉसच्या घरातून बाहेर पडतात तेव्हा शालीन आणि एम.सी.स्टॅनमध्ये भांडण होते. वाद इतका विकोपाला गेला की शिवला त्यांचे भांडण सोडवायला जावे लागले.

'बिग बॉस 16' चा ग्रँड फिनाले १२ फेब्रुवारीला आहे. शोमध्ये सध्या ५ स्पर्धक आहेत आणि आता फक्त विजेता बनवण्यासाठी वोटिंग लाईन्स सुरु आहेत. या सीझनमधील विजेत्या सदस्याला 21 लाख 80 हजारांच्या बक्षीस रकमेसह i10 Nios कार बक्षिस म्हणून मिळणार आहे. 12 फेब्रुवारीला ग्रँड फिनालेच्या माध्यमातून सलमान पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणं नंतर आज आंबेडकरी विचाराचे कार्यकर्त्यांचे निदर्शन

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT