

Pathaan Box Office Collection Day 14: शाहरुख खानचा 'पठान' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढत आहे. चित्रपटाचे कलेक्शन दिवसेंदिवस नवनवे रेकॉर्ड मोडत असून १४व्या दिवशीही कमाईच्या बाबतीत अव्वल आहे.
शाहरुख खान, दीपिका पदुकोन आणि जॉन अब्राहमच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडला नवी उर्जा दिली आहे. 'पठान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सलग दोन आठवडे पूर्ण केले असले तरी १४व्या दिवसाची कमाई पाहून सर्वच अचंबित झाले.
शाहरुख खानचा 'पठान' हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर इंग्लंड आणि न्यूझीलंड बॉक्स ऑफिसवरही सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. 'पद्मावत', 'दंगल', 'हाऊसफुल 4', 'माय नेम इज खान' सारख्या बड्या चित्रपटांनी कमी कालावधीत आकडा पार केला होता. आता पुन्हा एकदा शाहरुखच्या 'पठान'ने बॉक्स ऑफिसवर कमाईचा आकडा कायम ठेवत आपले स्थान पक्के करत आहे.
१२ व्या दिवशी जगभरात चित्रपटाने ८३५ ते ८४५ कोटींचे कलेक्शन केले होते. ११व्या दिवशी 'पठाण' चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ७८० कोटींची कमाई केली आहे. १०व्या दिवशी जगभरात बॉक्स ऑफिसवर ७२९ कोटींची कमाई केली आहे. भारतात दुसऱ्या दिवशी ७०.५ कोटींची कमाई केली आहे. तर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने ५७ कोटींचा व्यवसाय केला आहे. १३व्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 'पठान' चित्रपटाने सर्व भाषांमध्ये ९.५० कोटींची कमाई केली आहे.
शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर 'पठान' चित्रपटाने १४व्या दिवशी जगभरातील बॉक्स ऑफिसवर 'बाहुबली' चित्रपटाचा विक्रम मोडण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी म्हणजेच बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या १४ व्या दिवशी 'पठाण' चित्रपटाने सर्व भाषांमध्ये ७.७८ कमाई केली आहे. यासोबतच चित्रपटाचे भारतात एकूण कलेक्शन ४४६.२५ कोटींवर पोहोचले आहे. तर जगभरात या चित्रपटाने तब्बल ८४९ कोटींची कमाई केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.