'बिग बॉस 16' मधील (Bigg Boss 16) स्पर्धक शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अब्दु रोजिक (Abdu Rozik) सध्या चर्चेत आले आहे. शिव आणि अब्दु हे अडचणीत आले आहेत. त्यांना ईडीने समन्स (ED Summons) पाठवले आहेत. हाय-प्रोफाईल मनी लॉड्रिंग प्रकरणामध्ये (High-Profile Money Laundering Case) या दोघांना ईडीने नोटीस बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ही बातमी समोर येताच शिव ठाकरे आणि अब्दु रोजिकच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे हे आपण जाणून घेणार आहोत...
मिळालेल्या माहितीनुसार, शिव ठाकरे आणि अब्दु रोजिकला ईडीने समन्स पाठवला आहे. हे प्रकरण कथित ड्रग्ज माफिया अली असगर शिराझीशी संबंधित आहे. अली असगर शिराझी सध्या तुरूंगात आहे. अलीच्या कंपनीने शिव ठाकरे आणि अब्दु रोजिकला पैशांची मदत केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच आता ईडीने या दोघांना समन्स पाठवत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अली असगर शिराझी हसलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी चालवत होता. कंपनीने नार्को-फंडिंगद्वारे पैसे मिळवले आहेत. ही कंपनी अनेक वेगवेगळ्या स्टार्ट-अपमध्ये पैसे गुंतवते. या कंपनीने गुंतवणूक केलेल्या स्टार्ट-अपमध्ये शिव ठाकरेंच्या फूड अँड स्नॅक्स रेस्टॉरंट 'ठाकरे टी अँड स्नॅक्स' आणि अब्दु रोजिकच्या फास्ट फूड स्टार्टअप 'बर्गीर' ब्रँडचाही समावेश आहे.
या प्रकरणामध्ये साक्षीदार म्हणून शिव ठाकरेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. आता ईडीने बिग बॉस फेम अब्दु रोजिकला देखील चौकशीसाठी बोलावले आहे. कंपनीने नार्को-फंडिंगच्या माध्यमातून पैसे कमावले होते. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, शिराझीचा नार्को व्यवसायात सहभाग असल्याची माहिती शिव आणि अब्दूला समजताच दोघांनीही त्याच्याशी केलेला करार तात्काळ संपुष्टात आणला.
शिव ठाकरेने खुलासा केला की, त्यांनी 2022-23 मध्ये हसलर्स हॉस्पिटॅलिटीचे संचालक कृणाल ओझा यांची भेट घेतली होती. कृणालने त्याला ठाकरे चहा आणि स्नॅक्ससाठी भागीदारी करार दिला होता. या करारानुसार हसलर्स हॉस्पिटॅलिटीने ठाकरे चहा आणि स्नॅक्समध्ये मोठी रक्कम गुंतवली. शिव ठाकरेने ईडीला सांगितले की, 'जेव्हा त्यांनी त्यांच्या स्टार्टअपसाठी आर्थिक मदत मागितली तेव्हा ते शिराझी यांना भेटले नव्हते किंवा त्यांच्याबद्दल त्यांना माहितीही नव्हती.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.