Abdu Rozik
Abdu Rozik Instagram @abdu_rozik
मनोरंजन बातम्या

Abdu Rozik: बिग बॉस फेम अब्दू रोजिकचे घर पाहिले का? राजवाड्याहून जबरदस्त त्याचे घर, एकदा पाहाच...

Pooja Dange

Viral Video Of Abdu Rozik House: बिग बॉस हिंदी १६मधील' एका स्पर्धकाने सर्वांच्या मनात घर केलं. अब्दू रोजिक असे या स्पर्धकाचे नाव आहे. अब्दू या आठवड्यात स्पर्धेतून बाहेर गेला आहे. पण भारतातील आणि 'बिग बॉस १६' पाहणाऱ्या तमाम प्रेक्षकांच्या मनात तो कायम आहे. अब्दू एका एकमेव स्पर्धक होता जो डोक्याने नाहीतर मनाने खेळायचा. म्हणूनच त्याला सर्वांचे भरभरून प्रेम मिळाले.

अब्दूचा 'बिग बॉस १६'मधील प्रवास संपला आहे. परंतु प्रेक्षक त्याला पाहण्यास उत्सुक आहेत. कौटुंबिक सप्ताहादरम्यान अब्दूच्या पालकांना भारतात बोलावणे खूप कठीण होते. म्हणून त्याच्या वडिलांचा मेसेज करण्यात आला. व्हिडिओ कॉलद्वारे अब्दू त्याच्या वर घरी बोलण्यासही सांगण्यात आले. व्हिडिओ कॉलदरम्यान प्रेक्षकांना अब्दूचे दुबईतील घरही पाहायला मिळाले. अब्दुचे राजवाड्यापेक्षा कमी नाही. साजिद खानही अब्दुचे घर पाहून हरखून गेला.

ताजिकिस्तानचा नागरिक असलेला अब्दू रोजिक हा लग्जरी जीवन जगतो. अब्दूच्या घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अब्दूच्या घराचा हॉल खूप मोठा आणि भव्य असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच्या घरात व्हाईट मार्बलचा वापर करण्यात आला आहे. त्याचे घर खूप सुंदर आणि भव्य आहे. त्याचबरोबर या घरातील अब्दुच्या खोलीही खास डिझाईन करण्यात आली आहे.

'बिग बॉस'मध्ये व्हिडिओ कॉल दरम्यान अब्दूच्या खोलीची झलकही दाखवण्यात आली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अब्दूची महागडी कारही दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. मात्र, हे घर अब्दूचे नसून त्याच्या मित्राचे असल्याचेही काही सोशल मीडिया यूजर्सचे म्हणणे आहे. अब्दूच्या मित्राने त्याच्यासाठी त्याच्या घरात खास खोली बनवली आहे. पण या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे हे फक्त अब्दुलाच माहीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्याचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा, नेमकं काय आहे प्रकरण?|Ravindra Dhangekar

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड

Varanasi: नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घालून शुभेच्छा कुणी दिल्या? Video समोर!

Ramdev Baba : रामदेव बांबांचा सुप्रीम कोर्टाला नमस्कार, कोर्टही म्हणालं, आमचाही प्रणाम! पण...

होर्डिंग दुर्घटनेत १४ बळी गेल्यानंतर BMC प्रशासन खडबडून जागं, बेकायदा होर्डिंग हटवण्यास सुरुवात| Ghatkopar Hoarding collapse

SCROLL FOR NEXT