Archana Gautam  Saam TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 16 Finale: 'बिग बॉस 16'च्या टॉप 3 शर्यतीतून अर्चना गौतमचा पत्ता कट

'बिग बॉस 16' मिळाले टॉप 3 स्पर्धक.

Pooja Dange

Bigg Boss 16 Update: 'बिग बॉस १६'चा आज ग्रँड फिनाले आहे. या पर्वाची सुरूवात अशी झाली तसाच शेवट देखील धमाकेदार होता आहे. ढोल-ताश्याच्या गजरात या ग्रँड फिनालेची सुरूवात झाली. सलमान खान, भरती आणि क्रिष्णा यांनी कॉमेडी करत ग्रँड फिनालेचा माहोल बनवला.

बिग बॉस 16'च्या टॉप फाईव्हमध्ये शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालिन भनोत यांनी जागा मिळवली. तसेच सर्व स्पर्धकांनाही देखील घरामध्ये एन्ट्री केली आहे. रॅप बॅटल, संगीत खुर्ची, एकमेकांविषयी चांगल्या आणि वाईट असे विविध गेम्स शेवटच्या दिवशी देखील खेळण्यात आले.

बिग बॉसने यावेळी सर्व स्पर्धकांना आश्चर्याचा धक्का दिला. टॉप ५ स्पर्धकांच्या घरचे सुद्धा इतर स्पर्धकांसह कार्यक्रमात सहभागी झाले. तर टॉप ५ स्पर्धकांच्या आईंनी त्यांना दही-साखर भरवली आणि खेळाला सुरूवात झाली.

त्यानंतर सुरू झाला बिग बॉस फिनालेचा खरा खेळ. यात देखील बिग बॉसने ट्विस्ट टाकला. बिग बॉस स्पर्धकांना मिळून एक निर्णय घ्यायला सांगितला. सर्व स्पर्धकांना एका स्पर्धकाला टॉप ५ मधून बाहेर काढायचे होते. जर स्पर्धकांचे आणि प्रेक्षकांचे मत एक झाले तर त्यांना त्याच्या प्राईज मनीमध्ये १० लाख वाढणार असल्याचे बिग बॉसने सांगितले.

दरम्यान स्पर्धकांचे आणि प्रेक्षकांचे एकमत झाल्याने शालिन भनोत शेवटच्या दिवशी स्पर्धेतून बाहेर गेला. त्यानंतर खेळ रंगला टॉप ३मध्ये जागा बनविण्यासाठी. यासाठी बिग बॉसमध्ये सनी देओल आणि आमिष पटेल आले. तर टॉप ३च्या शर्यतीतून अर्चना गौतम बाहेर गेली.

आता 'बिग बॉस १६' ट्रॉफीचे दावेदार आहेत शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियांका चहर चौधरी. टॉप ५ स्पर्धकांमधून आधी शालिन भनोत आणि आता अर्चना गौतम बाहेर गेले आहेत. आता या स्पर्धकांमधून कोण या ट्रॉफीवर आपले नाव कोरणार हे काही वेळातच कळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WiFi Internet Tips : फक्त १ काम करा, घरातलं वायफाय धावेल बुलेटच्या स्पीडनं!

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांकडून शहरात नाकाबंदी!

Vande Bharat Train : झणझणीत मिसळ अन् चविष्ट पुरणपोळी, आता वंदे भारतमध्ये मराठमोळं जेवण

Early cancer symptoms: कॅन्सरचा धोका कसा ओळखाल? ही ८ लक्षणं वारंवार देतात संकेत, दुर्लक्ष करू नका!

Nidhhi Agerwal : संतापजनक! धक्काबुक्की अन् गैरवर्तन केले; अभिनेत्रीला चाहत्यांकडून वाईट वागणूक, VIDEO पाहून राग अनावर होईल

SCROLL FOR NEXT