Abdu Rozik Wedding Postpones Instagram @abdu_rozik
मनोरंजन बातम्या

Abdu Rozik Wedding : अब्दु रोझिकच्या निकाहची तारीख पुढे ढकलली, गोड क्षणाची आणखी वाट पाहावी लागणार; कारण काय?

Abdu Rozik Wedding Postpones : 'बिग बॉस १६' फेम अब्दु रोझिक वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. येत्या ७ जुलै रोजी अब्दु रोझिक निकाह करणार होता. पण त्याच्या निकाहची तारीख आता पुढे ढकलली आहे, त्याने स्वत: च कारण सांगितले आहे.

Chetan Bodke

गेल्या काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस १६' फेम अब्दु रोझिक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो चर्चेत होता. त्याने गेल्या महिन्यात साखरपुडाही केला. त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना लग्नाची गुड न्यूज दिली होती. येत्या ७ जुलै रोजी अब्दु रोझिक निकाह करणार होता. पण, अशातच त्याच्या निकाहची तारीख पुढे ढकलली असल्याची माहिती मिळत आहे. त्याने निकाहची तारीख पुढे ढकल्याची तारीखही सांगितली आहे.

अब्दु रोझिकने ई- टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये पहिली बॉक्सिंग मॅच खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे त्याने त्याच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे. ही बॉक्सिंग मॅच ६ जुलै रोजी होणार आहे. यामुळेच अब्दुने त्याच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे. मुलाखतीमध्ये अब्दुने सांगितले की, "मी माझ्या आयुष्यात केव्हा विचारही केला नव्हता, की मी कोणत्या किताबासाठी बॉक्सिंग मॅच खेळेल. यावर्षी माझ्या करियरमध्ये आणि माझ्या लव्ह लाईफमध्ये इतक्या चांगल्या गोष्टी घडल्यामुळे मला माझ्या लग्नाचीच तारीख पोस्टपोन करावी लागत आहे."

"कारण, ही मॅच आम्हाला आमच्या भावी आयुष्यामध्ये मोठी आर्थिक सुरक्षिता देणार आहे. अमिरा माझ्या निर्णयांचा कायमच आदर करते, कारण या एका निर्णयामुळे आमचे आयुष्य बदलणार आहे. आमिरा देत असलेल्या पाठिंब्यासाठी मी तिचे नेहमी ऋणी आहे. ही फायटिंग मॅच माझ्यासारख्या लोकांसाठी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेली आहे. ही मॅच जिंकण्यासाठी माझी ट्रेनिंग सुरू आहे." असं मुलाखतीमध्ये अब्दु रोझिक म्हणाला. अब्दु रोझिकने अद्याप त्याच्या लग्नाची पुढची तारीख जाहीर केलेली नाही.

अब्दुने गेल्या महिन्यामध्ये शारजाहच्या आमिरा नावाच्या मुलीसोबत साखरपुडा केला होता. त्याने साखरपुड्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. नेटकऱ्यांना हा साखरपुडा करत नसून एक पब्लिसिटी स्टंट करत असल्याचे वाटत होते. पण त्याने त्या चर्चा धुडकावून लावत साखरपुडा करत असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईतील तुर्भे एसटी बस आगारात भीषण आग

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT