Bigg Boss 14 Fame Rubina Dilaik Share Video of Babies Room Rubina Dilaik House -Instagram @rubinadilaik
मनोरंजन बातम्या

Rubina Dilaik ने चिमुकल्यांच्या आगमनासाठी सजवलं घर, VIDEO शेअर करत बेबी रूमची दाखवली खास झलक

Rubina Dilaik Share Video Of Baby Room: नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी या कपलकडून जोरदार तयारी सुरू आहे. अशामध्ये रुबिनाने सोशल मीडियावर (Social Media) शेअर केलेल्या एका व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

Priya More

Rubina Dilaik's Babies Room:

‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14 ) फेम रुबिना दिलैक (Rubina Dilaik) आणि तिचा पती अभिनव शुल्क (Abhinav Shukla) लवकरच आई-बाबा होणार आहे. अभिनव शुक्ला आणि रुबिना दिलैकने सप्टेंबर महिन्यात सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत चाहत्यांना गोड बातमी दिली होती. घरी नवा पाहुणा येणार असल्यामुळे हे कपल खूपच खुश आहे.

नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी या कपलकडून जोरदार तयारी सुरू आहे. अशामध्ये रुबिनाने सोशल मीडियावर (Social Media) शेअर केलेल्या एका व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

रुबिना दिलैकला सध्या ९वा महिना आहे. त्यामुळे कधीही रुबिना गुडन्यूज देऊ शकते. अशामध्येच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे जो वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रुबीनाने पहिल्यांदाच तिच्या मुलांची खोली व्हिडीओमद्वारे दाखवली आहे. या व्हिडिओमध्ये रुबीनाने आपल्या मुलांच्या आगमनासाठी खास पद्धतीने घर सजवल्याचे दिसत आहे.

रुबिना दिलैकने बेबी रूमचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रुबीना बेबी रूममधील एक एक गोष्टी चाहत्यांना दाखवताना दिसत होती. अभिनेत्रीने बेबी रूमच्या भिंतीवर झाड आणि पक्ष्यांच्या घरट्यांची पेंटिंग केली आहे. तर पलंग आणि पाळणाही सुंदर डिझाइन केला आहे. एवढेच नाही तर बेबी रूममधील प्रत्येक छोट्या- छोट्या गोष्टीची काळजी घेतली जात आहे. विशेषत: रंगाच्या बाबतीत रुबिनाने विशेष काळजी घेतली आहे. बेबी रूमला आकाशी निळा आणि राखाडी रंगाचे कॉम्बिनेशन करत सजवण्यात आले आहे. यामुळे बेबी रूम खूप छान आणि आकर्षित दिसत आहे.

रुबिनाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने जांभळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. रुबिनाच्या चेहऱ्यावर प्रेग्नन्सी ग्लो स्पष्टपणे दिसत आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला रुबिना पडदे हटवताना दिसत आहे आणि नंतर बाळाच्या खोलीची झलक दाखवताना दिसत आहे. अभिनेत्रीने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने सुंदर कॅप्शनही दिले आहे. 'Nesting' म्हणजेच 'घरटे बांधत आहे' असं कॅप्शन तिने दिले आहे.

रुबिना दिलीकने अलीकडेच तिच्या पॉडकास्ट शोमध्ये सांगितले होते की, ती फक्त एकच नाही तर जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. यासोबतच अभिनेत्रीने सांगितले की, गरोदरपणाच्या तिसर्‍या महिन्यात तिचा अपघात झाला होता. त्यामुळे ती खूप घाबरली होती. सध्या अभिनेत्रीचे आई-वडील आणि बहीण मुंबईत आले असून ते देखील नव्या पाहुण्याच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT